भाऊ, सावत्र बहिणी, शांतनू आणि खानसामे....रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार कोणाला काय मिळणार?

उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने सामान्य माणूसही हळहळला. रतन टाटा यांचं कार्य त्यांच्या निधनानंतरही सुरु आहे. रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीबद्दल घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. 

| Oct 26, 2024, 11:21 AM IST

उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने सामान्य माणूसही हळहळला. रतन टाटा यांचं कार्य त्यांच्या निधनानंतरही सुरु आहे. रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीबद्दल घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. 

1/9

परोपकारी या शब्दाची खरी ओळख उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या वागणुकीतून करुन दिली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची दहा हजार कोटी रुपयांच्या वैयक्तिक संपत्तीचे त्यांच्या 'इच्छापत्रा'नुसार वाटप होऊ घातले आहे. उघडकीस आलेल्या इच्छापत्रानुसार, अगदी त्यांच्या प्रिय श्वान टिटोपासून ते दीर्घकाळचा स्वयंपाकी राजन शॉ यांच्यापर्यंत प्रत्येकाची वाटेकरी म्हणून नावे नमूद आहेत.

2/9

टाटा यांच्या आधीच्या पाळीव श्वानाच्या मृत्यूनंतर साधारण सहा वर्षांपूर्वी टिटोला दत्तक घेण्यात आले. त्यांचा दीर्घकाळचा स्वयंपाकी राजन शॉ हे त्याची काळजी घेतील आणि याची तजवीज रतन टाटा यांनी इच्छापत्रात केली आहे. पाळीव प्राण्यांसाठी संपत्ती बाजूला ठेवणे ही पाश्चिमात्य देशात एक सामान्य प्रथा आहे, परंतु भारतात ती दुर्मीळ आहे. 

3/9

9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86  व्या वर्षी रतन टाटा यांचे निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले. तेथे रक्तदाब अचानक कमी झाल्याने निधन झाले. 

4/9

रतन टाटा यांच्या वैयक्तिक संपत्तीचे मूल्य 10  हजार कोर्टींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, त्यांनी त्यांचे फाउंडेशन, भाऊ जिमी टाटा, सावत्र बहिणी शिरीन आणि डेना जेजीभॉय आणि घरातील कर्मचारी सदस्यांसह विविध लाभार्थ्यांना मालमत्तेत स्थान दिले आहे.

5/9

रतन टाटा यांच्या मालमत्तेत महाराष्ट्रातील अलिबाग येथे 2000 चौरस फुटांचा समुद्रकिनारी असलेला बंगला, मुंबईच्या जुहू तारा रोडवरील दोन मजली निवासस्थान आणि 350 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या मुदत ठेवी यांचा समावेश आहे. 

6/9

टाटा यांनी शंतनू नायडूसोबतचा सहयोगी उपक्रम याच कर्ज माफ केलं असून गुडफेलाजमधील आपली भागीदारी सोडली आहे. 

7/9

165अब्ज डॉलरची उलाढाल असणाऱ्या टाटा समूहाची मूळ कंपनी टाटा सन्समध्येही त्यांची अवधी 0.83 टक्के भागभांडवली मालकी आहे. विश्वस्त न्यासांना समभाग दान करण्याच्या टाटा समूहाच्या वारशानुसार, टाटा सन्समधील त्यांचा हिस्सा रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनकडे हस्तांतरित केला जाईल.

8/9

टाटा यांच्या इच्छापत्रात त्यांचे खानसामे सुबय्या यांच्यासाठीही तरतूद केली गेली आहे, ज्यांच्याशी त्यांचे तीन दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध होते. याबरोबरच टाटा यांचे साहाय्यक व व्यवस्थापक शंतनू नायडू यांचाही उल्लेख इच्छापत्रात आहे.

9/9

टाटा सन्समधील हिश्श्याबरोबरच, टाटा मोटर्ससह टाटा समूहाच्या इतर उद्योगांमध्ये स्तन टाटा यांचे स्वारस्यदेखील रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनकडे जाईल. कुलाब्यातील हालेकाई घर, जेथे ते शेवटच्या श्वासापर्यंत राहिले होते, ते टाटा सन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी, इवार्ट इन्व्हेस्टमेंट्सकडे असेल.