संपत्ती 500 कोटींच्यावर! महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी दोन आमदार गुजराती

महाराष्ट्रातील श्रीमंत आमदार कोण आहेत जाणून घेऊया. 

| Oct 25, 2024, 23:45 PM IST

Maharashtra Assembly Elections 2024 :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारांनी जाहीर झालेल्यांनी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मालमत्ता आणि संपत्तीचा देखील उल्लेख करण्यात येतो. जाणून घेऊया सर्वाधिक मालमत्ता असणारे आमदार कोण?  

 

1/10

 महाराष्ट्रात अनेक आमदार कोट्याधीश आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोण आहेत. त्यांची संपत्ती किती.

2/10

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांकडे सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. पत्नी अमृता फडणवीसांच्या नावे 7.9 कोटींची संपत्ती आहे. 

3/10

समीर दत्तात्रय मेघे (Sameer Meghe)

समीर दत्तात्रय मेघे हे भारतीय जनता पक्ष मतदारसंघाचे आमदार आहेत.  हिंगणा, नागपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 159 कोटी आहे.

4/10

प्रशांत रामशेठ ठाकूर (Prashant Thakur)

प्रशांत रामशेठ ठाकूर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.  पनवेल हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 183 कोटी आहे.

5/10

राजेश संभाजीराव पवार (Rajesh Sabhajirao Pawar)

राजेश संभाजीराव पवार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नायगाव, नांदेड हा त्यांचा  मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 191 कोटी आहे.

6/10

अबू अझीम अस्मी (Abu Azim Asmi)

अबू अझीम अस्मी हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. मानखुर्द शिवाजीनगर चे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 209 कोटी आहे. 

7/10

विश्वजीत पतंगराव कदम (Viswajit Patangrao Kadam)

विश्वजीत पतंगराव कदम हे कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. पलूस कडेगाव हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची मालमत्ता 216 कोटी रुपये आहे. 

8/10

संजय चंद्रकांत जगताप (Sanjay Chandrkant Jagtap)

संजय चंद्रकांत जगताप हे कॉंग्रेस पक्षाचे पुण्यातील पुरंदर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची  एकूण मालमत्ता 245 कोटी आहे. 

9/10

मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha)

मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील  मलबार हिलचे आमदार आहेत.  मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 441 कोटी इतकी आहे. 

10/10

पराग शहा (Parag Shah)

पराग शहा हे मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांची  एकूण मालमत्ता 500 कोटींच्या आसपास आहे.