मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात घरांची विक्री वाढली, आकडेवारी आली समोर
या वर्षी मार्च अखेर 9 प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 4 लाख 81 हजार 566 होती.
Real Estate Sales: या वर्षी मार्च अखेर 9 प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 4 लाख 81 हजार 566 होती.
1/8
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात घरांची विक्री वाढली, आकडेवारी आली समोर
Real Estate: मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातून घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आकडेवारी समोर आली असून मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह देशातील 9 प्रमुख शहरांमध्ये घराच्या विक्रीमध्ये कमालाची वाढ दिसून आली आहे. नवीन पुरवठ्याच्या तुलनेत जास्त विक्रीमुळे, गेल्या तीन महिन्यांत देशातील 9 प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 7 टक्क्यांनी घटून सुमारे 4.81 लाख युनिट्सवर आली आहे.
2/8
रिअल इस्टेट क्षेत्रात वेगाने बदल
रिअल इस्टेट क्षेत्रात दिवसेंदिवस वेगाने बदल घडत आहेत. या क्षेत्रातील डेटाचे विश्लेषण करणारी कंपनी PropEquity ने आपल्या अहवालातून महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार, या वर्षी मार्च अखेर 9 प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 4 लाख 81 हजार 566 होती. डिसेंबर 2023 अखेर हा आकडा 5 लाख 18 हजार 868 युनिट होता.
3/8
9 शहरांचा समावेश
4/8
नवीन युनिट्सचा पुरवठा 15% कमी
लोकांनी नवीन घरे घेण्यापेक्षा न विक्री झालेली घरे घेण्यास प्राधान्य दिल्याचे या आकडेवारीतून समोर आले, असे प्रोपइक्विटीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) समीर जासुजा यांनी सांगितले. देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांची जास्त मागणी असूनही, जानेवारी-मार्चमध्ये निवासी मालमत्तांच्या नवीन युनिट्सचा पुरवठा 15% कमी झाला. त्यानंतर ही आकडेवारी 69 हजार 143 युनिट्सवर आली.
5/8
आठ प्रमुख शहरे
6/8
एकूण निवासी मालमत्ता
7/8