1/8
Virat Kohli, Suresh Raina, IPL 2018,
2/8
Virat Kohli, Suresh Raina, IPL 2018,
3/8
Virat Kohli, Suresh Raina, IPL 2018,
या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराटचे नाव अव्वल स्थानी आहे. त्यानंतर सुरेश रैनाचा(४५५८)नंबर लागतो. तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा(४३४५), चौथ्या स्थानावर गौतम गंभीर (४२१०) आणि पाचव्या स्थानावर डेविड वॉर्नर(४०१४) आहे. सुरेश रैना चेन्नईकडून खेळतोय मात्र दुखापतीमुळे तो सध्या संघाबाहेर आहे. स्नायू ताणले गेल्याने तो पुढील दोन सामन्यांत चेन्नईकडून खेळू शकणार नाही.
4/8
Virat Kohli, Suresh Raina, IPL 2018,
मुंबईविरुद्धच्या सामन्यात विराटला धावांटी टंकसाळ उघडता आली. मुंबईविरुद्ध त्याने ९२ धावांची दमदार खेळी केली. यासोबतच त्याने या स्पर्धेत नवा इतिहास रचला. ही खेळी करताना विराटने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. त्याने या स्पर्धेतील सुरेश रैनाचा रेकॉर्डही मोडीत काढला. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सुरेश रैना(४५५८) च्या नावावर होता. विराटने हा रेकॉर्ड मोडीत काढलाय. विराटच्या खात्यात आता ४६१९ धावांची भर पडलीये.
5/8
Virat Kohli, Suresh Raina, IPL 2018,
१० एप्रिलला सुरेश रैनाला कोलकाताविरुद्धच्या सामन्यात सुनील नरेनच्या गोलंदाजीवर धाव घेत असताना दुखापत झाली होती. चेन्नईने मोहालीमध्ये १५ एप्रिलला पंजाबसोबत सामना खेळला होता. यात त्यांना पराभव सहन करावा लागला. आता त्यांचा पुढील सामना २० एप्रिलला होणार आहे. पुण्यात चेन्नईचा सामना राजस्थानविरुद्ध होणैर आहे. सुरेश रैना चेन्नई संघासाठी भरवशाचा फलंदाज आहे. यासोबतच त्याची फिल्डिंगही चांगली आहे.
6/8
Virat Kohli, Suresh Raina, IPL 2018,
विराट कोहली २००८ पासून ते आतापर्यंत बंगळूरु संघाकडून खेळतोय. सुरेश रैनाला मागे टाकत कोहलीने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. टी-२०मध्ये एखाद्या संघासाठी ५ हजाराहून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी विराटने बंगळूरु संघासाठी १५८ डावांत ४९५१ धावा केल्या होत्या. विराटने बंगळूरुकडून चॅम्पियन्स लीगमध्ये खेळताना १५ सामन्यांत १४ डावांत ४२४ धावा केल्या होत्या. विराटच्या नावावर बंगळूरुसाठी १६८ सामन्यांत ५०४३ धावा आहेत.
7/8
Virat Kohli, Suresh Raina, IPL 2018,
विराट कोहलीने २०१६मध्ये याच स्पर्धेत १६ डावांत ८१.०८ च्या सरासरीने ९७३ धावा केल्या होत्या. या स्पर्धेच एका खेळाडूने बनवलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. दरम्यान २०१७मध्ये विराट या स्पर्धेत तितकासा यशस्वी ठरला नाही. यंदाच्या हंगामात तो ज्या पद्धतीने आक्रमक खेळ करतो त्यामुळे वाटतेय की विराट याही हंगामात नवा रेकॉर्ड करेल.
8/8