Redmi च्या जबरदस्त 5G फोनची किंमत धाडकन कोसळली; 11 हजारांनी स्वस्त झाल्याने खरेदीसाठी झुंबड

जर तुम्ही Redmi चे चाहते असाल आणि 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, Redmi K50i 5G मोबाइल 11 हजारांनी स्वस्त करण्यात आला आहे.   

Jun 26, 2023, 10:48 AM IST
1/7

भारतीय बाजारपेठेत शाओमीने आपलं एक चांगलं स्थान निर्माण केलं आहे. रेडमीचे मोबाइल खिशाला परवडणारे तसंच उत्तम फिचर्ससह उपलब्ध असल्याने ग्राहक त्यांना पसंती देतात. दरम्यान, आता शाओमीने आपल्या रेडमी ब्रँडच्या एका प्रसिद्ध मॉडेलची किंमत कमी केली आहे. रेडमीने अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार,  Redmi K50i 5G ची किंमत 11 हजारांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे या फोनसाठी आता 31 हजार 999 ऐवजी 20 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहे.   

2/7

बॅनरवर ‘Price Drop Alert’ असं लिहिण्यात आलं आहे. किंमत कमी झालेली असतानाच या मोबाइलवर 1500 रुपयांचा इस्टंट डिस्काऊंटही मिळत आहे. पण यासाठी तुम्हाला ICICI बँकेचं कार्ड वापरावं लागणार आहे. या फोनमध्ये 144Hz डिस्प्ले, डायमेंसिटी 8100 प्रोसेसर आहे.   

3/7

Redmi K50i 5जी मध्ये 6GB + 128GB आणि 8GB + 256GB असे दोन व्हेरियंट आहेत. यामध्ये फँटम ब्ल्यू, क्विक सिल्व्हर और स्टील्थ ब्लॅक रंग उपलब्ध आहेत.   

4/7

Redmi K50i 5G मध्ये 6.6-इंचाचा IPS LCD FH+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचं रेज्योलूशन 1080 x 2460 पिक्सल आहे. खास बाब म्हणजे याचा डिस्प्ल 144Hz च्या रिफ्रेश रेट आणि 270Hz च्या टच सँपलिंग रेटसह येतो.   

5/7

Redmi K50i 5G मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सल सेल्फी शूटर कॅमेरा देण्यात आला आहे.   

6/7

Redmi K50i मध्ये लिक्विड कूलिंग टेक्नोलॉजी 2.0 सह थर्मल मॅनेजमेंटसाठी 7-लेअर ग्रेफाइट आणि वेपर चैंबर आहे.  

7/7

या फोनमध्ये 67W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसंच 5080mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Redmi K50i चे ड्युअल स्पीकर डॉल्बी एटमॉस सपोर्ट सह येतात. फोनमध्ये  3.5mm टा हेडफोन जॅकही आहे.