अमिताभ बच्चनवर खरंच तुझं प्रेम आहे का? रेखानं एका ओळीत सांगितलं - 'दुनिया भर का प्यार…'

Rekha Amitabh Bachchan Love Story : एका मुलाखती रेखा यांनी बिग बींवर प्रेम होतं, याची कबुली दिली होती. जया बच्चन यांच्या नात्याबद्दलही त्या मन मोकळेपणाने बोलल्या होत्या. 

नेहा चौधरी | Oct 10, 2024, 01:00 AM IST
1/12

चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रेखा (Rekha birthday) यांचा आज वाढदिवस आहे. आईने मारहाण करुन त्यांना अभिनेत्री बनवलं, हे फार कमी लोकांना माहितीये.  1958 मध्ये बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

2/12

सौंदर्याची खाण असं आजही त्यांना म्हटलं जातं. बनारसी साडी, त्यावर दागिने आणि कपाळावर सिंदूर...हे सिंदूर नेमकं कोणाचा नावाच अशी चर्चा आजही रंगते. तेव्हा पहिलं नाव येतं ते अमिताभ बच्चन यांचं. 

3/12

अनेक मीडिया रिपोर्टमध्ये रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमाचे अनेक किस्से सांगण्यात येतात. त्यांचं प्रेम कधी झालं, जया बच्चन यांना कळल्यावर काय झालं. त्यांचं ब्रेकअप कधी झालं असे अनेक किस्से सांगण्यात आले आहेत.   

4/12

1976 मध्ये ‘दो अंजाने’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांना डेट करू लागले, असं म्हटलं जातं. काळी सर्व वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये अमिताभ आणि रेखा यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या बातम्या झळकत होत्या. 

5/12

खरं तर रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी कधीही त्यांच्या प्रेमाबद्दल जाहीर काही बोलले नव्हते. पण रेखाने एका मुलाखतीत अमिताभवर प्रेम असल्याची जाहीर कबुली दिली होती. 

6/12

या मुलाखतीमध्ये रेखाला विचारण्यात आलं की, तिचं कधी बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होतं का? यावर प्रतिक्रिया देताना रेखा म्हणाली होती, 'अगदी.'

7/12

तेव्हा ती म्हणाली की, दुनिया भर का प्यार आप ले लिजियेगा...त्यांना बिग बी वेड्यासारखे आवडतात, पण त्यांचा अभिनेत्याशी तसा कोणताही संबंध नाही. 

8/12

सिमी ग्रेवालला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांनी खुलासा केला होता की, माझे त्यांच्याशी कधीही वैयक्तिक संबंध नव्हते, हे सत्य आहे. एक अभिनेता म्हणून मला ते खूप आवडतात. मी त्यांच्यावर प्रेम करते हे खंर आहे, जगभरातील प्रेमींपेक्षा, हे प्रेम कसले आहे या प्रेमाची मी व्याख्या करू शकत नाही.

9/12

या मुलाखतीत रेखा यांनी त्यांच्या आणि जया बच्चन यांच्या नात्याबद्दलही मोकळेपणाने सांगितलं होतं. रेखा यांनी स्पष्ट केलं होतं की त्या जया बच्चन यांचा खूप आदर करतात आणि दोघांमध्ये चांगलं संबंध आहेत. 

10/12

सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान अमिताभ आणि रेखा यांचं नातं जेव्हा जया बच्चन यांना कळलं तेव्हा या नात्याला ब्रेकही जया यांनी लावला.

11/12

जया बच्चन यांनी रेखाला अमिताभ घरी नसताना जेवायला बोलावलं. रेखाही त्यांच्या घरी आली तेव्हा जया यांनी त्यांना आदरतिथ्य केलं. त्या एकत्र जेवल्या आणि त्यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. 

12/12

त्यानंतर रेखा जायला निघाली तेव्हा जया त्यांना दारापर्यंत सोडायला आली. तेव्हा जया एकच म्हणाली मी अमिताभ यांना कधीही सोडणार नाही. बस त्या दिवसांपासून अमिताभ आणि रेखामध्ये दुरावा आला.