...मनू भाकरची सटकली अन् थेट इव्हेंट सोडून गेली! आईला विचारलेला नीरजबद्दलचा 'तो' प्रश्न खटकला

Manu Bhaker Angry By Question: ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत दोन पदकं जिंकल्यानंतरपासून मनू अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच एका कार्यक्रमात अगदीच विचित्र प्रकार घडला आहे. जाणून घ्या नेमकं घडलं काय?

| Aug 23, 2024, 15:24 PM IST
1/11

ManuBhakerAngry

आईच्या आधी मनूलाही एक विचित्र प्रश्न याच कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यानंतर आईला विचारलेला प्रश्न ऐकून मनू उठून निघून गेली. नेमकं घडलं काय पाहूयात...

2/11

ManuBhakerAngry

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला एक नाही तर दोन पदकं जिंकून देणारी मनू भाकर सध्या देशभरामध्ये चर्चेत आहे. मनूने भारतासाठी ऑलिम्पिक 2024 मध्ये दोन रौप्य पदकांची कमाई केली.

3/11

ManuBhakerAngry

दोन रौप्य पदकांवर नाव कोरणाऱ्या कामगिरीसहीत एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदकं जिंकणारी स्वतंत्र भारतामधील पहिली खेळाडू ठरली आहे. मनू पॅरिसवरुन परत आल्यावर तिचं जंगी स्वागत करण्यात आलं.

4/11

ManuBhakerAngry

यापूर्वी मनूने आशियाई खेळ, कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये नाव कमवलं होतं. भविष्यात मनू अधिक चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा भारतीयांना आहे.  

5/11

ManuBhakerAngry

मनू भाकरला ऑलिम्पिक 2024 नंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली असून ती तिथे जातेय तिथे तिला भेटण्यासाठी, तिच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी, तिच्याबरोबर फोटो, सेल्फी काढण्यासाठी, तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी होत असल्याचं दिसत आहे. मनू सध्या ही प्रसिद्धी एन्जॉय करत आहे.   

6/11

ManuBhakerAngry

मात्र दुसरीकडे मैदानावरील कामगिरीबरोबरच मनू मैदानाबाहेरील गोष्टींमुळे चर्चेत आहे. तिला मिळणाऱ्या या प्रसिद्धीचा त्रासही सहन करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार एका कार्यक्रमादरम्यान घडला. 

7/11

ManuBhakerAngry

मंगळवारी म्हणजेच 20 ऑगस्ट 2024 रोजी मनु भाकरने तिच्या आईसोबत चेन्नईमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.   

8/11

ManuBhakerAngry

अपेक्षेप्रमाणे मनूच्या या कार्यक्रमाला गर्दी झाली. मात्र या ठिकाणी एका पत्रकाने विचारलेला प्रश्न ऐकून या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला फारच अवघडल्यासारखं झाल्याचं वृत्त 'स्टारस्पोर्ट्स'ने दिलं आहे. 

9/11

ManuBhakerAngry

मनूच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी मनूला एका पत्रकाराने प्रश्न विचारला. "विनेश फोगाटसंदर्भातील निर्णय हा राजकीय हेतूने प्रेरीत वाटतोय, यावर तुमचं काय मत आहे?" असा तो प्रश्न होता. यावर मनू उत्तर देण्याआधीच अन्य एका पत्रकाने तिच्या आईला, "तुमचं नीरजबरोबर (चोप्रा) काय बोलणं झालं?" हा प्रश्न विचारला.   

10/11

ManuBhakerAngry

मनूला आधीच तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसताना आईलाही नको तो प्रश्न विचारल्याने मनू संतापली.  

11/11

ManuBhakerAngry

हे असले वायफळ प्रश्न ऐकून मनूने केवळ प्रश्न टाळले असं नाही तर ती तिच्या आईसहीत कार्यक्रमाच्या ठिकाणाहून संतापून निघून गेल्याचं बातमीत म्हटलं आहे.