चपातीच्या पिठात मिसळा 'हा' एक पदार्थ, सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट

चपात्या हा आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. मुलांच्या डब्यांसाठी किंवा रोजच्या जेवणातही चपात्या खाल्ल्या जातात. पण याच चपात्या तुम्ही अधिक आरोग्यदायी करु शकता.

| Nov 27, 2024, 14:09 PM IST

चपात्या हा आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. मुलांच्या डब्यांसाठी किंवा रोजच्या जेवणातही चपात्या खाल्ल्या जातात. पण याच चपात्या तुम्ही अधिक आरोग्यदायी करु शकता.

1/8

चपातीच्या पिठात मिसळा 'हा' एक पदार्थ, सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट

आजकाल लोक पोटाच्या समस्यने त्रस्त आहेत. बद्धकोष्ठता आणि पोटदुखी यामुळं अनेक जण त्रस्त आहेत. आपण दररोज चपात्या खातो. अशावेळी हेल्दी चपात्या बनवल्या तर पोटदेखील साफ राहते आणि पचनसंस्थाही सुरळीत ठेवण्यास मदत करते. 

2/8

Mix This One Thing In The Flour Before Making Roti To Clear Your Stomach

चपात्यांचे पीठ मळताना त्यात आळशीची पावडर मिक्स करा. यामुळं पोटाच्या समस्या दूर होऊ शकतात. आळशीत फायबर, ओमेगा-3, फॅटी अॅसिड आणि अँटी ऑक्सीडेंट्सची भरपूर मात्रा आढळते. यामुळं पोट साफ करण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतो.   

3/8

आळशीत फायबरचे प्रमाण अधिक असते ज्यामुळं पचनतंत्र मजबूत राहते. यामुळं पोट साफ होण्यास मदत होते. तसंच, आळशीत अँटी इफ्लेंमेटरी गुण असतात ज्यामुळं ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. जी आतड्यातील सूज कमी करण्यास मदत करते.

4/8

आळशी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. लीवर हेल्दी ठेवते. आळशीचे नियमित सेवन ठेवण्यासाठी  यामुळं बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. 

5/8

चपाती कशी बनवावी?

एक वाटी गव्हाच्या पीठात 1-2 चमचे आळशीची पावडर मिसळा. नंतर त्यात गरजेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्या. नंतर या पीठाच्या चपात्या करा. 

6/8

आळशी व्यतिरिक्त तुम्ही मेथी दाण्याची पावडर किंवा चिया सीड्सदेखील टाकू शकतो. दोन्हींमध्ये फायबरचा चांगला स्त्रोत असतो. 

7/8

आळशीचे सेवन योग्य प्रमाणात करा. जास्त आळशी खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. तसंच, मुलं आणि गर्भवती महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेव करायला द्या. 

8/8

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)