पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला! मानवाने बचावासाठी गोळीबार केल्यावर हवेतल्या हवेत झाले गायब

 एलियन्स संबंधित अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, पेरू देशात जे काही घडलं, ते थरकाप उडवणारं आहे. कारण येथे एलियन्सने मानवावर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. 

Aug 16, 2023, 23:24 PM IST

Peru Alien Attack News : पृथ्वीवर पुन्हा एकदा एलियन्स अवतरलेत. 7 फूट उंची, पिवळेधम्मक डोळे, अंगात हुडीसारखा वेश. हे एलियन्स चक्क माणसांवर हल्ला करू लागलेत. पेरू देशातल्या एका गावात एलियन्सनी हल्ला केल्याचं समजते. धक्कादायक बाब म्हणजे बचावासाठी एलियन्सवर गोळीबार करण्यात आला. मात्र गोळ्यांचाही काहीच परिणाम झाला नाही. दोनवेळा एलियन्सवर फायरिंग करण्यात आली. मात्र, एकही गोळी एलियन्सला लागली नाही.. हवेतल्या हवेत एलियन्स गायब झाले, असा दावा स्थानिक गावक-यांनी केलाय. या प्रकारामुळं गावक-यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.

1/6

पेरू देशातल्या एका गावात एलियन्सनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

2/6

7 फूट उंचीचे हल्लेखोर तस्कर होते की खरंच एलियन्सनी हा हल्ला केला होता, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.   

3/6

एलियन्सच्या हल्ल्यामागचं नेमकं सत्य काय, याचा शोध आता स्थानिक पोलीस घेतायत.

4/6

याआधी सोनं तस्करी करणा-या माफियांनी पेरूच्या नानाय नदी जवळच्या जंगलात जेटपॅकचा वापर केला होता.

5/6

स्थानिक लोकांनी घाबरून घरात लपून राहावं त्यांनी सोन्याच्या खाणींपासून दूर राहावं, यासाठी हा सगळा बनाव केल्याचं सांगितलं जातंय.

6/6

हा सगळा अंधश्रद्धेचा भाग असल्याचा दावा काहींनी केला. तर, सोने तस्करीशी संबंधित माफिया जाणीवपूर्वक घबराट पसरवत असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.