30 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा मालक, जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा, सेलिब्रिटीसारखी लाईफस्टाईल

जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा..ज्याचं नाव आहे गुंथर. 

वनिता कांबळे | Sep 07, 2024, 23:15 PM IST

 Richest Dog In The World  :  जगातील श्रीमंतांच्या आलिशान जीवनशैलीबद्दल तुम्ही बरंच काही ऐकलं असेल. मात्र तुम्ही कधी जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्याबद्दल ऐकलंय का? बहामास येथे जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा आहे. तो 30 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे. त्याची लाईफस्टाईल पाहून थक्क व्हाल.   

1/7

संपूर्ण मालमत्ता गुंथर आणि त्याच्या कुटुंबाकडे राहावी यासाठी गुंथर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. गुंथरच्या नावावर अनेक मालमत्ता आहेत...गुंथरवर एक सिनेमाही बनवला जातोय. ज्यात त्याची आणि त्याच्या मालकाची कहाणी असेल. 

2/7

जर्मन काउंटेस कार्लोटा लेबिनस्टीननं आपली सर्व संपत्ती या कुत्र्याला दिली होती. कारण लेबिनस्टीनचा मृत्यू झाला तेव्हा गुंथर शिवाय त्याचं जवळ कुणही नव्हतं.  त्यामुळेच लेबिनस्टीननं आपली सर्व संपत्ती आपल्या लाडक्या कुत्र्याला दिली होती.  

3/7

 जिथे बहामासमधील व्हिलामधून नोकर त्याच्यासाठी येतात. कॅरेबियन बेटावर त्याचं जे घर आहे त्याची किंमत 6 अब्ज इतकी आहे. गुंथर अनेकदा आलिशान डिनर आणि यॉट ट्रिपवर जातो आणि जगभर फिरतो.

4/7

जर्मन शेपर्ड जातीचा हा कुत्रा प्रसिद्ध पॉप सिंगर मॅडोनाच्या जुन्या घरात राहतो आणि त्याच्याकडे एक मोठी नौका देखील आहे. 

5/7

गुंथर सध्या लक्झरीयस आयुष्य जगतोय. त्याच्या नावावर थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 30 अब्ज रूपयांची संपत्ती आहे. 

6/7

गुंथरची सेवा करण्यासाठी दिवसरात्र अनेक नोकर झटक असतात. विशएष म्हणजे त्याच्या नावावर एक फुटबॉल क्लब देखील आहे. 

7/7

 बहामास मधल्या आलिशान व्हिला..  जो आधी मॅडोनाचा होता. मात्र आता या व्हिलाचा मालक गुंथर आहे.  बहामासमधील या व्हिला व्यतिरिक्त असे बरेचसे बंगले आहेत जे गुंथरच्या नावावर आहे.