'मला करायचं नाही असं...', ईशासोबतच्या लग्नावर ऋषी सक्सेनाचा खुलासा

'काहे दिया परदेस' मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता ऋषी सक्सेना अमराठी असला तरी त्याचे लाखो चाहते आहेत. त्यानं या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दरम्यान, आता ऋषी सक्सेनानं त्याच्या आणि ईशाच्या लग्नावर वक्तव्य केलं आहे.   

Diksha Patil | Jun 07, 2024, 19:28 PM IST
1/7

खासगी आयुष्यावर खुलासा

'काहे दिया परदेस' मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता ऋषी सक्सेनानं नुकतंच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे.  

2/7

ईशासोबत रिलेशनशिप

ऋषी आणि अभिनेत्री ईशा केसकर बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 

3/7

कधी करणार लग्न?

आता हे जोडपं लग्न कधी करणार याचं ऋषी सक्सेनाने उत्तर दिलं आहे.

4/7

ईशावर आहे अवलंबून

'मित्रम्हणे 'ला दिलेल्या मुलाखतीत ऋषी सक्सेना खुलासा केला, 'मला खरंच माहित नाही. बघुया, असं नाही की मला लग्न नाही करायचं पण कधी करायचं ते माहित नाही. हे ईशावरच अवलंबून आहे. माझ्यावरच कधीच अवलंबून नसतं. त्यामुळे तिलाच विचारा. मी तर तयारच आहे. पण जेव्हा ती तयार असेल ती मला सांगेल तेव्हा होईल.'

5/7

लिव्हइन रिलेशनशिप

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात. 

6/7

कधी केला रिलेशनशिपचा खुलासा?

2018  मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने आपलं प्रेम व्यक्त केलं होत. 

7/7

कधी आणि कुठे झाली भेट?

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर या दोघासची पहिली भेट झाली होती. यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांची मैत्री बहरली आणि एक दिवस ही मैत्री प्रेमाच्या कबुलीपर्यंत आली.