Rohit Sharma: रोहित शर्मा तोडणार धोनीचा 'हा' महारेकॉर्ड; कोहलीपेक्षाही ठरणार वरचढ!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 11 जानेवारीपासून अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 सीरीजला सुरुवात होणार आहे.

Jan 09, 2024, 16:39 PM IST
1/8

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 11 जानेवारीपासून अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 सीरीजला सुरू करणार आहे. या सिरीजदरम्यान रोहित शर्माला स्वतःच्या नावे अजून एका रेकॉर्डची नोंद करण्याची संधी मिळणार आहे.    

2/8

या सिरीजमध्ये रोहित एम.एस धोनी आणि विराट कोहली यांना मागे टाकण्याची शक्यता आहे.   

3/8

रोहित शर्मा आणि विराट कोहली तब्बल एका वर्षानंतर T-20 संघात परतले आहेत.  

4/8

विराट आणि रोहितची जोडी 2022 मध्ये झालेल्या T20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत खेळली होती. मात्र त्यानंतर टी-20 मध्ये या दोघांनाही खेळण्याची संधी मिळाली आली नाही. 

5/8

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकूण 39 सामने जिंकले आहेत. तर महेंद्रसिंग धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 41 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकून दिले आहेत.

6/8

रोहितने आगामी T20 सिरीजमधील तिन्ही सामने जिंकल्यास तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा भारताचा कर्णधार बनणार आहे. अशा प्रकारे त्याला धोनीला मागे टाकण्याची संधी मिळणार आहे.  

7/8

केवळ धोनीचा नाही तर विराट कोहलीचा रेकॉर्ड करण्याची संधीही रोहित शर्माला मिळणार आहे. कर्णधार म्हणून कोहली हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक रन करणारा फलंदाज आहे. कोहलीच्या नावावर 1570 रन आहेत.   

8/8

कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर 1527 रन आहेत. कोहलीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला केवळ 44 रनची गरज आहे. रोहितला हा रेकॉर्ड मोडणं सहज शक्य होणार आहे.