वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं! कर्णधारांचं फोटोशुट, दहा संघांममध्ये 46 दिवस रंगणार क्रिकेटचा महाकुंभ

ICC Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी काही तास शिल्लक असताना सर्व 10 संघाच्या कर्णधारांनी फोटोशूट केलं.

Oct 04, 2023, 22:08 PM IST

Captain's meet event photoshoot : वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं आहे. उद्यापासून वर्ल्ड कपच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्व 10 संघाच्या कर्णधारांनी फोटोशूट केलं.

1/6

मॉर्गन

इंग्लंडचा माजी कॅप्टन इवॉन मॉर्गन याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्याकडे ट्रॉफी सोपावली.

2/6

46 सामने

10 संघात 46 सामने खेळवले जाणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

3/6

इंग्लंड VS न्यूझीलंड

पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. 5 ऑक्टोबरला दुपारी 2 पासून हा सामना पहायला मिळेल.

4/6

विश्वचषक

आयसीसीचा पुरुष क्रिकेट विश्वचषक यंदा भारतात 5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.

5/6

फोटोशूट

क्रिकेटच्या महाकुंभाला आता फक्त काही तास शिल्लक आहेत. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. अशातच आता टीमच्या कॅप्टन्सचं फोटोशूट पार पडलं.

6/6

कॅप्टन्सची उपस्थिती

रोहित शर्मा, बाबर आझम, केन विलयम्सन, जॉस बटलर, पॅट कमिन्स, शाकिब अल हसन, तेम्बा बावुमा, दासुन शनाका, हशमतुल्लाह शाहिदी आणि स्कॉट एडवर्ड्स यांनी उपस्थिती लावली होती.