रोहित शर्मा, विराट आणि शुभमन... टीम इंडियाचे स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये 'या' संघाविरुद्ध खेळणार सामने?

टीम इंडियाचे स्टार खेळाडू यंदा रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसू शकतात. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली चंगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्देशांनुसार शुभमन गिल, केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतात. 

| Jan 15, 2025, 15:39 PM IST
1/7

रोहित शर्मा 2015 नंतर प्रथमच रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी तयार आहे. रोहित मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी उतरेल. रोहित जम्मू - काश्मीर नंतर मेघालय विरुद्धच्या शेवटचे दोन सामने खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो. 

2/7

विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांना दिल्लीच्या संघात शेवटच्या दोन रणजी ट्रॉफी सामने खेळण्यासाठी सामील केलं जाऊ शकतं. ऋषभ पंत याला दिल्लीच्या संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. दोघे सौराष्ट्र आणि रेल्वे विरुद्ध शेवटचे दोन सामने खेळू शकतात. 

3/7

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासाठी सलामी देणारा केएल राहुल जर कर्नाटककडून खेळला तर शेवटच्या दोन रणजी सामन्यांमध्ये त्याचा सामना पंजाब आणि हरियाणा सोबत होऊ शकतो.   

4/7

टीम इंडियाचा ऑल राउंडर रवींद्र जडेजा हा शेवटच्या दोन रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये गुजरात संघाकडून खेळताना दिसू शकतो. ऑल राउंडर खेळाडू पहिल्या सामन्यात दिल्ली आणि नंतर आसामविरुद्ध खेळताना दिसू शकतो. 

5/7

स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगले प्रदर्शन केले होते. मोहम्मद सिराज हैदराबादसाठी रणजी ट्रॉफी खेळू शकतो. असे झाल्यास तो हिमाचल प्रदेश आणि विदर्भ संघांकडून शेवटचे दोन सामने खेळेल. 

6/7

शुभमन गिल रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळू शकतो. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गिलने चांगले प्रदर्शन केले नव्हते. गिल जर पंजाब संघाकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळला तर तो कर्नाटक आणि बंगाल विरुद्ध सामने खेळेल. 

7/7

पीटीआयच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयने स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश दिले होते. बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं की ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळायचे आहे त्यांनी रणजी ट्रॉफीचे सामने खेळणे महत्वाचे आहे. रेड बॉल टूर्नामेंट 23 जानेवारी पासून सुरु होणार आहे, तर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 6 फेब्रुवारी पासून वनडे सीरिजला सुरुवात होईल. तेव्हा या सीरिजपूर्वी विराट आणि रोहित कमीत कमी एक रणजी ट्रॉफी सामना खेळू शकतात.