PHOTOS : शुभमन गिलने आई वडिलांना गिफ्ट केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

Shubhman Gill New Home : 13 जानेवारी रोजी देशभरात लोहारीचा सण साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत लोहरीचा सण साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले.  याचे वेळी भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलने सुद्धा आपल्या कुटुंबासोबत नवीन घरात लोहरीचा सण साजरा केला. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले. 

| Jan 15, 2025, 14:11 PM IST
1/7

शुभमन गिलने आपल्या आई वडिलांना नवीन घर भेटमध्ये दिलं. शुभमनचे वडील लखविंदर गिल यांचं मुलाच्या क्रिकेट करिअरमध्ये मोलाचे योगदान राहिलंय.  मुलगा शुभमन याच्या क्रिकेट ट्रेनिंगसाठी त्याच्या वडिलांनी फाजिल्का येथील घर सोडले आणि ते मोहाली येथे शिफ्ट झाले होते. आई वडिलांच्या कष्टाचे फळ म्हणून क्रिकेटमध्ये यशस्वी होत असलेल्या शुभमनने त्यांना नवीन घर गिफ्ट केले. 

2/7

उत्तर भारतातील पंजाब हरियाणा भागात लोहरीचा सण साजरा केला जातो. क्रिकेटर शुभमनने आपल्या नवीन घरात कुटुंब आणि मित्र परिवारासह लोहरीचा सण साजरा केला.   

3/7

अतिशय पारंपरिक पद्धतीने शुभमनच्या कुटुंबाने लोहरी सण साजरा केला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये घरासोबत लोहरीची पवित्र अग्नी जळताना दिसतेय. 

4/7

शुभमन गिल नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर स्ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग होता. मात्र फलंदाजीत तो चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे काहीदिवस शुभमन आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. 19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा होईल. यात शुभमन गिलची निवड होऊ शकते. 

5/7

शुभमन गिलने नव्या घरातील पहिल्या लोहरी सणाचे फोटो शेअर करत त्याला "नवीन घर, जुन्या परंपरा. नवीन घरातील पहिली लोहरी खूप उबदार, आनंद आणि अंतहीन कृतज्ञतेसह" असे कॅप्शन दिले.   

6/7

25 वर्षांच्या शुभमन गिलने भारताकडून आतापर्यंत 32 टेस्ट, 47 वनडे आणि 21 टी 20 खेळल्या आहेत. शुभमनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 12 शतक ठोकली असून यातील सर्वाधिक 6 शतक त्याने वनडे क्रिकेटमध्ये केली आहेत. यासह आयपीएलमध्ये शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार असून त्याने विविध संघांकडून आयपीएलमध्ये 103 सामने खेळले यात त्याने 3216 धावा आणि 4 शतक ठोकली आहेत. 

7/7

शुभमन गिलने खरेदी केलेल्या नव्या आलिशान घराची किंमत ही कोट्यवधींमध्ये असल्याची माहिती मिळतेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार या घराची किंमत 5 कोटींपेक्षा जास्त असल्याचे समजते.