बॉडिबिल्डर सौंदर्यवती, 'या' मॉडेलच्या फोटोने सोशल मीडियावर उडवली खळबळ... करते लाखो रुपयांची कमाई

Vladislava Galagan: पिळदार शरीरयष्टी (Body Builder) बनवणं हे एका दिवसातलं काम नाही. यासाठी अनेक वर्ष कठोर मेहनत करावी लागते. मनगटात जिद्द असावी लागते. जगभरात असे अनेक बॉडिबिल्डर आहेत ज्यांनी आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर नाव कमावलं आहे. यात महिलाही मागे नाहीत. पुरुषांची (Mens) मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या बॉडिबिल्डिंग क्षेत्रात आता महिलाही (Women Body Builder) उतरल्या आहेत. सध्या अशाच एका बॉडिबिल्डर महिलेचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले असून तिच्या सौंदर्य आणि बॉडीने लोकांना वेड लावलं आहे.   

| Jun 28, 2023, 20:36 PM IST
1/5

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 27 वर्षांच्या या महिला बॉडिबिल्डरचं नाव आहे  व्लादिस्लावा गॅलागन. तिची पिळदार शरिरयष्टी पाहून पुरुषही लाजतील. गेल्या अकरा वर्षांपासून व्लादिस्लावा अनेक तास व्यायामशाळेत कठोर मेहनत घेतेय. आज महिला बॉडिबिल्डिंग क्षेत्रात व्लादिस्लावा सर्वोत्कृष्ट बॉडिबिल्डर म्हणून ओळखली जाते. व्लादिस्लावा रशियाची आहे.  Image Source: Instagram/@vladigalagan  

2/5

व्लादिस्लावा 2018 बॉडिबिल्डिंग क्षेत्रात उतली. अगदी कमी वयात तीने या क्षेत्रात आपली छाप उमटवली. सोशल मीडियावर आपल्या पिळदार शरीरयष्टीचे फोटो शेअर करत तीने प्रचंड लोकप्रियता गाठली आहे.  Image Source: Instagram/@vladigalagan

3/5

व्लादिस्लावाने गेल्या वर्षी अॅडल्ट कंटेंट असलेल्या ओनली फॅन्स ही साईट जाईन केली. यावर तीनेकाही फोटो अपलोड केले. इथे तिचे मसल्स लोकांना इतके आवडले की आता लोकं पैसे देऊन तिचे फोटो पाहातात. Image Source: Instagram/@vladigalagan

4/5

एका रिपोर्टनुसार व्लादिस्लावा ओनली फॅन्स या साईटवर फोटो शेअर करत लाखो रुपयांची कमाई करते. पण काही लोकांनी तिच्यावर स्टेरॉइड्स घेऊन बॉडी बनवल्याचा आरोप केला आहे.  Image Source: Instagram/@vladigalagan

5/5

व्लादिस्लावाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. व्यायामशाळेत अनेक तास घाम गाळल्यानंतर आपण ही बॉडी बनवल्याचं ती म्हणते. याशिवाय स्ट्रिक्ट डाएटही फॉलो करत असल्याचं उत्तर तीने टीकाकारांना दिलं आहे.  Image Source: Instagram/@vladigalagan