Salman Khan चं लग्न तुटण्याचं कारण आलं समोर, होणाऱ्या पत्नीनं अभिनेत्यासोबत दुसरीलाच पाहिलं आणि...

Salman Khan Sangeeta Bijlani : सलमान खानने आजपर्यंत लग्न केलं नाही. पण अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत त्याचा साखरपुडा झाला होता. लग्नाची पत्रिका वाटण्यात आली होती त्यानंतरही त्यांचं लग्न तुटलं होतं. हे लग्न तुटण्यामागील कारणं समोर आलं आहे. 

Sep 15, 2023, 08:26 AM IST

Salman Khan Sangeeta Bijlani : सलमान खान लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा बॉलीवूडमधील हिरो आहे. लाखो तरुणींच्या हृदयात अधिराज्य करणारा या अभिनेत्याने अजून लग्न केलं नाही. मात्र त्याचा अफेयर आणि लग्नाच्या अनेक बातम्या रोज समोर येतं असतात. 

1/14

सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या अफेयरची आजही चर्चा होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सलमान आणि अभिनेत्री, मॉडल संगीता बिजलानी यांचा साखरपुडा झाला होता. पण तरीही हे लग्न होऊ शकलं नाही. संगीता बिजलानीने सलमान नंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं होतं. आज त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे. 

2/14

संगीचा बिजलानी आणि सलमान खान आजही चांगले मित्र आहेत. पण एकेकाळी दोघांचे खूप प्रेम होतं. लग्नाची तारीख ठरली आणि लग्नपत्रिका वाटल्या गेल्या त्यानंतही हे लग्न झालं नाही. 

3/14

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सलमान आणि संगीताच्या लग्नाची तारीख 27 मे 1994 ही ठरली होती. पण त्या एका घटनेने त्या दोघांमधील नातं संपुष्टात आलं. 

4/14

लग्नाच्या एक महिन्यापूर्वी सलमान खान विचित्र वागत असल्याने संगीता बिजलानीला त्याचावर संशय आला. त्यानंतर ती सलमान खानवर नजर ठेवून होती.   

5/14

संगीता बिजलानीने एका पुरस्तकात या घटनेबद्दल सांगितलं आहे. सलमान खान आपल्या पाठीमागे दुसऱ्या अभिनेत्रीसोबत असल्याचं तिला कळलं.  या फसवणूकमुळे संगीता तुटली.

6/14

ती दुसरी अभिनेत्री होती सोमी अली. हिनेदेखील त्या दिवशी काय झालं होतं त्याबद्दल इतक्या वर्षांनी एका व्हिडीओमध्ये खुलासा केला आहे.

7/14

सलमान खान संगीतासोबत लग्न करणार होता. त्यावेळी एका दिवशी त्या अपार्टमेंटमध्ये संगीताने मला आणि सलमान खानला रंगेहात पडकलं, असं सोमी म्हणाली.   

8/14

सलमान खान तिचा क्रश होता आणि ती त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी इच्छुक होती. पण सलमान खानने माझ्यासोबत लैगिंक अत्याचार केला आणि मारहाण केली. 

9/14

ती अशीही म्हणाली की, सलमान खान तिला यासाठी मारायचा कारण तो तिच्यावर प्रेम करायचा. त्यावेळी मी इतकी मुर्ख होती की, मी एका पत्रकाराला बोलून गेली की, तो मला मारतो कारण तो माझ्यावर खूप प्रेम करतो.

10/14

संगीता बिजलानीने आम्हाला रंगेहात पडकलं त्यानंतर माझ्यासोबतही तेच घडलं. यालाच कर्म म्हणतात, असं सोमी म्हणाली. काही वर्षांनी मला माझी चूक कळली.   

11/14

त्यासोबत सलमानच्या वागणुकीच अजून एक उदाहरण दिलं. ती म्हणाली की, एकदा मी कोल्डड्रिंक पित होती तेव्हा सलमान खान आला आणि त्याने मला विचारलं तू काय पिते आहेस.

12/14

त्यावर मी म्हणाली की कोल्डड्रिंक, पण सलमानला कळलं की मी त्यातून रम पितेय तर त्याने ती ग्लास माझ्या डोक्यावर ओतला.   

13/14

ती पुढे हेदेखील म्हणाली की, सलमान खान विरोधात ऐश्वर्या राय बच्चन हिने मुंबई पोलिसांकडे एफआइआर दाखल केली होती.    

14/14

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका मुलाखतीचा टीझर आहे. त्यामुळे तिने या मुलाखतीत काय काय धक्कादायक खुलासे केले आहे, हे संपूर्ण मुलाखतीतून समोर येईल.  सोमी अली काय म्हणाली पाहा व्हिडीओ -          View this post on Instagram                       A post shared by Shubhankar Mishra (@theshubhankarmishra)