महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...
Sandhan Valley Tourist Places in Maharashtra: आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे सौंदर्य पावसळ्यात आणखीच बहरेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अनेक गड, किल्ले आणि दऱ्या ट्रेकर्सना आकर्षित करतात. यापैकीच एक आहे ती सांधण व्हॅली (Sandhan Valley). ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. मात्र, ही दरी तितकीच धोकादायक देखील आहे. पावसाळ्यात इथं ट्रेकिंगसाठी जाणे म्हणजे मोठ्या धाडसाचे काम आहे.





