पावसाचा आनंद घेण्यासाठी निघाली सारा

बुधवारी रात्री पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेली सारा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

Aug 08, 2019, 13:18 PM IST

मुंबई : मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या चर्चा नेहमीच वाऱ्यासारख्या पसरत असतात. परंतू अता सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आता पर्यंत तिचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्याचप्रमाणे ती आगामी चित्रपट 'लव आज कल २' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. बुधवारी रात्री पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेली सारा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याच दरम्यानचे तिचे काही निवडक फोटो...

1/5

दिल्लीमध्ये पहिल्यांदाच साराने फॉशन शोमध्ये रॅम्प वॉक केले. यावेळेस साराचा उत्साह वाढवण्यासाठी चक्क कार्तिक याठिकाणी उपस्थित होता.

2/5

अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खानच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच पसरत आहेत. बॉलिवूडच्या या जोडीला चाहते सुद्धा दमदार पसंती देत आहेत.

3/5

केदारनाथ चित्रपटाच्या माध्यमातून साराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचप्रमाणे दिल्लीत पार पडलेल्या फॅशन शोच्या माध्यमातून रॅम्प वॉकवर सुद्धा डेब्यू केले.

4/5

कार्तिक सारा सोबतच तिच्या घरच्यांसह सुद्धा जवळीक निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. तो साराची आई अमृता सिंग सोबत फोनवर बोलत असतो. 

5/5

त्याचप्रमाणे तिचा भाऊ इब्राहिम सोबत मैत्री वाढवण्याच्या प्रयत्नात कार्तिक आहे.