Santosh Deshmukh Murder: मस्साजोगमध्ये टेन्शन वाढलं! थेट मोबाईल टॉवरवर...; 'या' 5 मागण्या केंद्रस्थानी

Santosh Deshmukh Murder Case Massajog Demand List: बीडमधील केज येथील मस्साजोग गावच्या सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर 45 दिवसानंतरही या प्रकरणावरुन गावकरी संतप्त असून आज थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं जाणार आहे. नेमक्या या गावकऱ्यांच्या मागण्या काय आहेत पाहूयात...

| Jan 13, 2025, 09:35 AM IST
1/9

massajogdemand

मस्साजोगमध्ये आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नेमक्या या गावतील गावकऱ्यांच्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी काय मागण्या आहेत, जाणून घेऊयात...

2/9

massajogdemand

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आला. या हत्येला 25 दिवस उलटून गेल्यानंतरही या प्रकरणातील एक आरोपी फरार असून राज्यात ठिकठिकाणी संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.  

3/9

massajogdemand

याच पार्श्वभूमीवर आज संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज मस्साजोगमधील मोबाईल टॉरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. खंडणीत आरोपीवर खुनाचा गुन्हा का नाही? असा सवाल करत ते आंदोलन करणार आहेत. असं असतानाच या आंदोलनात धनंजय देशमुखांबरोबर सहभागी होणाऱ्या मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या काय मागण्या आहेत पाहूयात...  

4/9

massajogdemand

वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करावा

5/9

massajogdemand

फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी

6/9

massajogdemand

सतीश माने आणि उज्जवल निकमांची नियुक्ती करावी

7/9

massajogdemand

एसआयटीमध्ये पंकज कुमावत यांचा समावेश करावा

8/9

massajogdemand

कुटुंबाला तपासाची माहिती द्यावी

9/9

massajogdemand

प्रशांत महाजनांना निलंबित करावं