साताऱ्यातील श्री जितोबा बगाड यात्रेत गुलालाची उधळण; पाहा भारावणारे क्षण

satara news : देवदेवतांची स्वरुपं आणि त्यांच्याविषयीच्या धारणा, उत्सवही बदलतात. अशा या बहुरंगी आणि बहुढंगी महाराष्ट्रात 'जत्रा' ही संकल्पना कैक वर्षांपासून अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे.

May 03, 2024, 14:29 PM IST

satara news : तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : महाराष्ट्राला मिळालेला सांस्कृतिक वारसा कायमच अनेकांना भारावत आला आहे. इथं गावागावांनुसार प्रथा परंपरा बदलत जातात. 

 

1/7

जत्रा

satara news jitoba bagad yatra photos

जत्रा म्हटलं की, गावखेड्यांपासून अगदी शहरी भागांपर्यंत असणारा कल्ला, गर्दी, एखाद्या देवतेच्या नावानं होणारा गजर असंच एकंदर चित्र पाहायला मिळतं.   

2/7

बगाड

satara news jitoba bagad yatra photos

महाराष्ट्रात जत्रा, यात्रांच्या याच वलयामध्ये बगाड यात्रा विशेष गाजतात. तुम्ही बावधनच्या बगाड यात्रेविषयी ऐकलच असेल. अशीच एक यात्रा नुकतीच साताऱ्याच पार पडली. 

3/7

श्री जितोबा बगाड यात्रा

satara news jitoba bagad yatra photos

साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील जिंती येथे प्रसिद्ध असलेली श्री जितोबा बगाड यात्रा उत्साहत पार पडली झाली. नीरा नदीच्या काठावर सुख-समृद्धीने नटलेले सुंदर असलेले जिंती गावातील बारा बलुतेदार समाजातील लोकांच्या माध्यमातून बगाड यात्रा संपन्न होत असते. 

4/7

350 वर्षांपासूनची परंपरा

satara news jitoba bagad yatra photos

गेल्या 350 वर्षांपासून इथं ही यात्रा भरत असते. जिल्ह्यासह राज्यतील नागरिक श्री जितोबा बगाड यात्रेसाठी जिंती येथे येत असतात. जितोबा नावाने जायघोष, चांगभलं करत बगाडाचा थरार इथं पाहायला मिळत असतो.    

5/7

हराळी वैष्णव समाज

satara news jitoba bagad yatra photos

हराळी वैष्णव समाजातील मठात बगाड्याचा मानकर याचा गावाच्या वतीने पोशाख परिधान केला जातो. पोशाख झाल्यानंतर वाजत गाजत जितोबाच्या नावानं चांगभले बोला जयघोष करत बगाड्याच्या मानकऱ्याला श्री.जितोबा मंदिरातून दर्शनासाठी घेऊन जातात.   

6/7

नवसाचे नारळ

satara news jitoba bagad yatra photos

बगाडला भावी भक्त नवसाचे नारळाचे तोरण पैसे बांधले जातात हजारो भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. विशेष म्हणजे हा बगाडाचा मान हरळी वैष्णव समाज यांना गेल्या 350 वर्षांपासून आहे.  

7/7

संस्कृती

satara news jitoba bagad yatra photos

महाराष्ट्रात विविध गावांमध्ये विविध पद्धतींनी बगाड यात्रा पार पडते. जितोबा यात्रा त्यातीलच एक. अशा या महाराष्ट्राच्या बगाड यात्रेला सिनेजगतातही स्थान मिळालं आहे. काही आठवतंय का?