महाराष्ट्रातील पहिल्या नंबरचा उंच धबधबा; संपूर्ण भारताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर

साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे. 

| May 25, 2024, 20:49 PM IST

Satara Thoseghar Waterfall : मान्सूसमध्ये संपूर्ण देशभरात महाराष्ट्राइतके सुंदर निसर्ग सौंदर्य कुठेच पहायला मिळत नाही. पावसाळ्यात प्रवाहीत होणारे फेसाळणारे धबधबे पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकतात.  भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा महाराष्ट्रात आहे. साताऱ्यातील ठोसेघर धबधबा खूपच प्रसिद्ध आहे.

 

1/7

हा धबधबा सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा आहे. तर, भारतातील उंच धबधब्यांच्या यादीत याचा दुसरा क्रमांक आहे.  

2/7

150 ते 180 मी.उंचीवर वाहणारा हा धबधबा पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा अविष्कार आहे.   

3/7

 सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर ठोसेघर गाव आहे. या गावातच हा धबधबा आहे. गावाच्या नावावरुनच हा धबधबा ठोसेघर धबधबा म्हणून ओळखला जाते.    

4/7

सातारा रेल्वे स्थानकातून तसेच सातरा बस स्थानकातून ठोसेघर धबधबा येथे जाण्यासाठी बसची सोय आहे.   

5/7

सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा  सह्याद्रीच्या सौंदर्यात भर घालतो. 

6/7

ठोसेघर धबधब्याचे एकूण 3 मुख्य प्रवाह  वाहतात. 

7/7

 पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.  ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गॅलरी बांधण्यात आली आहे. तसेच जाळ्या देखील लावण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक पर्यटक सुरक्षा कठडे ओलांडून स्वत: जीव धोक्यात घालतात.