Saving Tips: सेव्हिंग करण्यासाठी चिल्लरही कामाची, या टिप्स ठेवा लक्षात

Best Saving Tips: आजच्या काळात बचत करणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. बचतीच्या माध्यमातून भविष्याची तरतूद केली जाते. बचत करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

| Jan 10, 2023, 15:38 PM IST
1/5

Saving Money: बचत करणे आजच्या काळीजी गरज बनली आहे. काही लोकांसाठी बचत करणे इतके सोपे नाही. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला त्या वस्तूची खरोखर गरज आहे का हे स्वतःला विचारा. तसेच एक प्रश्न विचारा की तुम्ही त्या वस्तूसाठी जी रक्कम देत आहात, त्यासाठी खरच इतकी किंमत आहे का? तुम्ही स्वत:ला विचारा आणि मिळेल्या उत्तरानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही एखादी वस्तू खरेदी करावी की नाही. यामुळे तुमच्या उधळपट्टीला आळा बसेल.

2/5

ऑनलाइन खरेदी करताना, जर तुम्हाला कोणतीही अनावश्यक वस्तू खरेदी करावीशी वाटली तर त्यासाठी 24 तास प्रतीक्षा करा. त्याच्या किमतीत काही फरक असू शकतो. जर त्याची किंमत वाढली तर साहजिकच तुम्हाला ती वस्तू जास्त महाग पडेल आणि तुमचे मन त्यापासून विचलित होऊ शकते. थोडी वाट पाहा किंमत कमी झाली की खरेदी करा, त्यामुळे पैशांची बचत होईल.

3/5

आज आपण प्रत्यक्ष खरेदी ऐवजी ऑनलाईन खरेदीवर भर देत आहोत. तसेच प्लास्टिक मनीचा वापर करत असतो. त्यामुळे आपण किती पैसे खर्च याकडे लक्ष नसते. अशावेळी तुम्ही बचतीला महत्व देण्याची गरज आहे. ऑनलाइन शॉपिंगमुळे खिशातून पैसे सहज निघून जातात हेही कळत नाही. अशा परिस्थितीत, ऑनलाइन खरेदी करताना, जर तुम्हाला कोणतीही अनावश्यक वस्तू खरेदी करावीशी वाटली तर त्यासाठी 24 तास प्रतीक्षा करा. त्याच्या किमतीत काही फरक असू शकतो. जर त्याची किंमत वाढली तर साहजिकच तुम्हाला ती वस्तू जास्त महाग पडेल आणि तुमचे मन त्यापासून विचलित होऊ शकते. थोडी वाट पाहा किंमत कमी झाली की खरेदी करा, त्यामुळे पैशांची बचत होईल.

4/5

रोखीने काहीही खरेदी केल्यास नाणीही मिळतात. ती नाणीही तुम्ही जपून ठेवा. ही छोटी बचत दीर्घ मुदतीसाठी तुमच्यासाठी चांगली रक्कम देखील बनू शकते.

5/5

 जर तुम्ही एखाद्या गोष्टीचे सब्सक्रिप्शन घेतले असेल आणि तुम्ही ते वापरत नसाल, तर असे सबस्क्रिप्शन त्वरीत थांबवा किंवा पुन्हा सदस्यता घेऊ नका. असे केल्याने तुमची खूप बचत देखील होईल.