New Parliament : नवीन संसद भवन पाहा कसे असणार? पहिले फोटो आलेत समोर
Inside Picture of New Parliament: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसद भवनात सादर करण्याची जास्त शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. नव्या संसदेच्या लोकसभा सभागृहाच्या कामाचे फोटोसमोर आलेत. अर्थसंकल्पावर शेवटची नजर टाकण्यासाठी बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे.
Surendra Gangan
| Jan 19, 2023, 14:10 PM IST
1/5
नवीन संसद भवनाचे दालन (New Parliament) तयार आहे. लोकसभा सभागृहाच्या आतील फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये लोकसभा अतिशय भव्य आणि प्रशस्त दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या वर्षी संसदेच्या नवीन इमारतीत राष्ट्रपतींचे संयुक्त अभिभाषण करण्याची तयारी करत आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही (Budget Session) संसदेच्या नवीन सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे.
2/5
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसदेच्या सभागृहात सादर करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतात. दुसऱ्या दिवशी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळी नवीन इमारतीत अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा आहे.
3/5
4/5
संसदेच्या नवीन इमारतीमध्ये 1,224 खासदार बसण्याची व्यवस्था असणार आहे. म्हणजेच एकावेळी 1,224 खासदार बसू शकतात. यामध्ये लोकसभेत ८८८ तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात. नवीन इमारतीत मध्यवर्ती हॉल असणार नाही. दोन्ही सभागृहांच्या खासदारांना लोकसभेच्या सभागृहातच बसता येणार आहे. नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे.
5/5