पाहा रुबाब shaaz jungच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्याखुऱ्या ब्लॅक पँथरचा

Jul 08, 2020, 18:17 PM IST
1/8

पाहा रुबाब shaaz jungच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्याखुऱ्या ब्लॅक पँथरचा

सोशल मीडियावर दर दिवशी असंख्य व्हिडिओ, मीम्स आणि फोटो व्हायरल होत असतात. त्यावर शेकड्यानं प्रतिक्रियाही येत असतात. यातच आता सोशल मीडियाच्या जंगलामध्ये असा एक प्राणी रुबाबात वावरत आहे, ज्याला पाहून सारेच भारावले आहेत. सर्व छायाचित्रे सौजन्य- (shaazjung  / इन्स्टाग्राम)

2/8

पाहा रुबाब shaaz jungच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्याखुऱ्या ब्लॅक पँथरचा

'अर्थ' या नावे असणाऱ्या एका ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या अतिदुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यानं साऱ्यांनाच भुरळ पाडली असून, थेट 'मोगली' या लोकप्रिय कार्टूनची आठवण सर्वांना करुन दिली. सर्व छायाचित्रे सौजन्य- (shaazjung  / इन्स्टाग्राम)

3/8

पाहा रुबाब shaaz jungच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्याखुऱ्या ब्लॅक पँथरचा

भारतातील कर्नाटक येथे असणाऱ्या काबिनीच्या जंगलामध्ये हा ब्लॅक पँथर फिरताना दिसला, अशा कॅप्शनसह हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. ज्याला आतापर्यंत असंख्य लाईक्स आणि रिट्विट मिळाले आहेत. वन्यजीव छायाचित्रकार Shaaz Jung यांनी २०१९ मध्ये हे दृश्य टीपलं होतं. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवरही ही छायाचित्र शेअर केली आहेत. सर्व छायाचित्रे सौजन्य- (shaazjung  / इन्स्टाग्राम) सर्व छायाचित्रे सौजन्य- (shaazjung  / इन्स्टाग्राम)

4/8

पाहा रुबाब shaaz jungच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्याखुऱ्या ब्लॅक पँथरचा

ही छायाचित्रं नेमकी कोणी टीपली याची माहिती मिळताच नेटकऱ्यांनी त्यांचा मोर्टा थेट Shaaz Jung यांच्या इन्टाग्राम प्रोफाईलकडं वळवला. सर्व छायाचित्रे सौजन्य- (shaazjung  / इन्स्टाग्राम)

5/8

पाहा रुबाब shaaz jungच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्याखुऱ्या ब्लॅक पँथरचा

पाहतो तर काय, इथे तर या रुबाबदार प्राण्याच्या एक नव्हे अनेक प्रती पाहायला मिळाल्या. सर्व छायाचित्रे सौजन्य- (shaazjung  / इन्स्टाग्राम)

6/8

पाहा रुबाब shaaz jungच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्याखुऱ्या ब्लॅक पँथरचा

आपल्या छायाचित्रांना मिळणारी ही लोकप्रियता पाहता Shaaz Jungने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचेच मनापासून आभार मानले. सर्व छायाचित्रे सौजन्य- (shaazjung  / इन्स्टाग्राम)

7/8

पाहा रुबाब shaaz jungच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्याखुऱ्या ब्लॅक पँथरचा

फोटो टीपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी थोडक्यात माहिती दिली. सर्व छायाचित्रे सौजन्य- (shaazjung  / इन्स्टाग्राम)

8/8

पाहा रुबाब shaaz jungच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्याखुऱ्या ब्लॅक पँथरचा

अतिशय सुरेख आणि तितक्याच संयमानं जंगलांच्या वाटांवर स्वच्छंदपणे वावरणाऱ्या या प्राण्याची झलक टीपणाऱ्या या छायाचित्रकाराची इतरही छायाचित्र ही तितक्याच तोडीची आणि कमाल आहेत. सर्व छायाचित्रे सौजन्य- (shaazjung  / इन्स्टाग्राम)