भारतात नाही तर ‘या’ मुस्लिम देशात आहे शकुनी मामाचा गांधार, 90% लोकांना उत्तर माहिती नाही

Gandhara : महाभारतातील शकुनी मामा त्याचा दृष्ट वृत्ती आणि बुद्धिबळ खेळातील कौशल्यामुळे आजही तो सर्वांच्या लक्षात आहे. या शकुनी मामाचं राज्य असलेल्या गंधारबद्दल सांगणार आहोत.

नेहा चौधरी | Feb 19, 2025, 17:40 PM IST
1/7

महाभारत हे भारतात प्रसिद्ध आहे. कौरव पाडव आणि शकुनी मामा यांच्याबद्दल लहानपणापासून सर्वांना गोष्टी माहिती आहेत. महाभारतामध्ये अनेक रोचंक कथा आहे. तुम्हाला महाभारतातील धूर्त शकुनी मामा आठवतो. तो त्याचा धूर्त बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होता. त्याचा धूर्त चालीमुळे तो हरलेले अनेक सामने बुद्धिबळात जिंकला आहे. दुर्योधनाच्या सर्व धोरणांमागे आणि कट रचण्यामागे शकुनी मामाचं डोकं होतं असं म्हटलं जातं. 

2/7

कौरवांचे मामा शकुनी हे गांधारचे राजा सुबाली यांचे पुत्र आणि गांधारीचे भाऊ होते. शकुनी मामा हे बुद्धिबळाच्या खेळात तज्ज्ञ मानले जायचे. महाभारत पाहताना शकुनी मामा यांचं गांधार प्रत्यक्षात भारतात कुठे आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण याच गांधारबद्दल जाणून घेणार आहोत.   

3/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, महाभारत काळातील गांधार हे आजच्या पाकिस्तानच्या पश्चिम आणि अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात वसलेल आहे. इतिहासकार असं सांगतात की, अफगाणिस्तानामधील कंदहार हे नाव गांधार यावरून ठेवण्यात आलं आहे.   

4/7

महाभारत काळातील गांधारबद्दल बोलायचं झालं तर प्राचीन काळातील गांधार हे एक शक्तिशाली राज्य होतं. कौरवांची आई गांधारी यांची ती जन्मभूमी होती. प्राचीन काळात गांधार हे महाजनपदांपैकी एक होतं. त्यावेळी त्याची राजधानी ही तक्षशिला होती.   

5/7

इतिहासकार सांगतात की, तक्षशिला हे त्या काळातील शिक्षण आणि संस्कृतीच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असं होतं. प्राचीन काळात शिक्षणासाठी इथे दूरुन दूरन लोक येत असतं.   

6/7

असं म्हटलं जातं की, प्राचीन काळात गांधार हे साम्राज्यात आजचा पूर्व अफगाणिस्तान, उत्तर पाकिस्तान आणि वायव्य पंजाबचा समावेश होता. महाभारताच्या कथेत तुम्हाला या सगळ्यांचा उल्लेख पाहिला मिळेल.   

7/7

इतिहासात असा उल्लेख पाहिला मिळतो की, अफगाणिस्तानचे कंधार हे नाव महाभारत काळातील गांधारवरून घेतले गेले असून शकुनी मामाला गांधारचा राजा म्हटलं गेलंय.