Shamita Shetty : 'या' 5 सेलिब्रिटींसोबत होती शमिता शेट्टी हिच्या प्रेमाची चर्चा, तरीदेखील 44 व्या वर्षी सिंगलच

Shamita Shetty Bday : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty)  44 वर्षांची झाली असली तरी तिला तिच्या स्वप्नांचा राजकुमार सापडलेला नाही. शमिता कधीच कोणाच्या प्रेमात पडली नाही असे नाही. पण तरीही ती आज सिंगलच आहे. 

Feb 02, 2023, 12:04 PM IST

Shamita Shetty Birthday  :  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) हिचा आज वाढदिवस...शमिता आज  44 वर्षांची झाली आहे पण ती अजूनही सिंगल आहे. असं नाही की, शमिता हिला कोणी भेटलं नाही. तिचं 5 सेलिब्रिटींसोबत लव्ह अफेयरची चर्चा झाली. नुकतंच तिचं नाव अभिनेता आमिर अली (Aamir Ali) शी जोडलं गेलं होतं. (Shamita Shetty love affair with these 5 bollywood celebrities but still single at 44 marathi news)

1/5

प्रेम प्रकरण नंबर 1

Shamita Shetty

शमिता शेट्टीचं सगळ्यात जास्त चर्चा झाली होती...ती म्हणजे राकेश बापटसोबतच्या (Raqesh Bapat) प्रेमाची. बिग बॉस 15 मध्ये एकत्र दिसले होते. हे लव्ह बर्ड हातात हात घालून जगभर खुलेआम फिरत होते. पण हे प्रेम जास्त काळ टिकलं नाही. राकेशने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे नात्याला पूर्णविराम लागल्याचं जाहीर केलं. 

2/5

प्रेम प्रकरण नंबर 2

Shamita Shetty

शमिता शेट्टी हिचं नाव एका क्रिकेटसोबतही जोडल्या गेलं होतं. पण यावर आजही कोणी स्पष्ट सांगत नाही. कधीकाळी युवराज सिंगला गुप्तपणे डेट करत होती, असं बॉलिवूडमधील सूत्र सांगतात. युवराज सिंगने (Yuvraj Singh) हेजलशी लग्न केले.पण शमिता अजूनही अविवाहित आहे.

3/5

प्रेम प्रकरण नंबर 3

Shamita Shetty

शमिता शेट्टीसह हरमन बावेजा (Harman Baweja) यांच्या अफेयरचीही चर्चा रंगली.  मात्र हरमनने केवळ इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला नाही तर शमितासोबत वेगळंही केलं. नुकतेच हरमनने साशा रामचंदानीशी लग्न केलं आहे. 

4/5

प्रेम प्रकरण नंबर 4

Shamita Shetty

पुढचं नाव आफताब शिवदासानी (Aftab Shivdasani) ...पण हेही नातं जास्त काळ टिकलं नव्हतं. इतर नात्यांप्रमाणे ते कधी आणि का संपले, याबद्दल आजही काही कळलं नाही. पुढे आफताबने निन दुसांजशी लग्न केलं.   

5/5

प्रेम प्रकरण नंबर 5

Shamita Shetty

शमिताचा पहिला चित्रपट 'मोहब्बतें' यातील तिचा हिरो उदय चोप्रासोबत (Uday Chopra) तिचं नाव जोडलं गेलं होतं. चाहत्यांना दोघांची केमिस्ट्री इतकी आवडली या दोघांनी लग्न करावं अशी इच्छा होती. पण उदय चोप्रा नर्गिस फाखरीला डेट करत होता.