राहूच्या नक्षत्रात शनीचं गोचर! 'या' राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी
Shani Nakshatra Gochar 2023 : शनिवार हा शनीदेवाची पूजा अर्चा करण्याचा दिवस असतो. शनी सध्या राहूच्या नक्षत्र शतभिषेमध्ये असून तिथे तो 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या नक्षत्रात शनि असल्यामुळे अशुभ योग निर्माण झाला आहे.
Shani Nakshatra Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमध्ये शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे ग्रह आहेत. या दोघांच्या गोचरमुळे सर्व राशींवर महत्त्वाचा परिणाम होतो. सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात कमी गतीने म्हणजे अडीच वर्षांने आपली जागा बदलतो. तक राहू नेहमी विरुद्ध दिशेने फिरतो. या दोन ग्रहांच्या राशीतील बदलाचा देखील खोल प्रभाव पडतो.






