महाराष्ट्रातील चमत्कारिक गाव! जिथे घरचं काय बँकांना देखील दरवाजे नाहीत; तरीही कुणाची चोरी करण्याची हिंमत होत नाही
जाणून घेऊया महाष्ट्रातील चमत्कारिक गावाविषयी जिथे घरांना दरवाजे नाहीत.
Facts About Shani Shingnapur : भारतातच काय संपूर्ण जगात कुठेही दरवाजे नसलेले एकही घर सापडणार नाही. महाराष्ट्रात मात्र, असे एक गाव आहे जेथे घरं काय, बँकांना देखील दरवाजे नसतात. शिंगणापूर असे या गावाचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे. शिंगणापूर गावात शनिदेवाचा अद्भुत चमत्कार पहायला मिळतो. येथे घरांना दरवाजे नसताना देखील चोरीच्या घटना घडत नाहीत.






