उत्सव नात्यांचा...; दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं शरद पवार- अजित पवार एकत्र, पाहा खास फोटो

Sharad Pawar Ajit Pawar : दिवाळीसुद्धा याला अपवाद ठरली नाही. दिवाळीतील पाडव्याच्या निमित्तानं शरद पवारांसोबत अजित पवारही एकाच फ्रेममध्ये दिसले आणि सर्वांच्याच नजरा वळल्या. 

Nov 15, 2023, 07:26 AM IST

Sharad Pawar Ajit Pawar : राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार जेव्हाजेव्हा एकाच छताखाली दिसले तेव्हातेव्हा चर्चांना उधाण आलं. 

1/7

पवार कुटुंब आणि दिवाळी सेलिब्रेशन

Sharad Pawar Family diwali celebration ajit pawar presence grabs attention

Sharad Pawar Ajit Pawar : दिवाळी म्हटलं की महाराष्ट्रातील काही कुटुंबांच्या सेलिब्रेशनवर आणि स्नेहसंमेलनावर सर्वांच्याच नजरा असतात. पवार कुटुंब हे त्यापैकीच एक. यंदाच्या वर्षी या कुटुंबाच्या  दिवाळी सेलिब्रेशनला राजकीय किनारही पाहायला मिळाली.   

2/7

राजकीय दुरावा

Sharad Pawar Family diwali celebration ajit pawar presence grabs attention

निमित्त ठरलं ते म्हणजे अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत केलेलं बंड आणि त्यानंतरचा शरद पवार यांच्यासोबतचा त्यांचा दुरावा. 

3/7

दिवाळी पाडवा...

Sharad Pawar Family diwali celebration ajit pawar presence grabs attention

पवार कुटुंबीय कायमच दिवाळीच्या निमित्ताने गोविंद बागेत एकत्र येतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळालं. यावेळी रात्रीचे दहा वाजून गेले तरीही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार तिथं पोहोचले नव्हते.   

4/7

आणि अजित पवार गोविंदबागेत आले...

Sharad Pawar Family diwali celebration ajit pawar presence grabs attention

पण, रात्री दहानंतर ते गोविंदबागेत दाखल झाले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनीही शरद पवारांची भेट घेतली. खुद्द सुप्रिया सुळे यांनीच सोशल मीडियावर या क्षणांचे फोटो शेअर केले.

5/7

यंदाची दिवाळी खास

Sharad Pawar Family diwali celebration ajit pawar presence grabs attention

पवार कुटुंबाची ही दिवाळी यंदा जास्तच खास होती, कारण कितीही राजकीय हेवेदावे असले तरीही नाती ही त्याहूनही महतत्वाची असतात हेच इथं पाहायला मिळालं. 

6/7

मतभेद विसरून साजरा करणार सण

Sharad Pawar Family diwali celebration ajit pawar presence grabs attention

पाड्व्यानंतर आता सुप्रिया सुळे भाऊबीजेनिमित्त काटेवाडीला जाणार आहेत. राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असं यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. 

7/7

पुढली पिढी

Sharad Pawar Family diwali celebration ajit pawar presence grabs attention

दरम्यान, या कुटुंबातील पुढली पिढी अर्थात पवार कुटुंबातील लेकरांमध्येही असाच एकोपा पाहायला मिळत आहे. त्यामुळं कुटुंबाची परंपरा पुढंही सुरुच राहील यात शंका नाही, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. (सर्व छायाचित्र सौजन्य- सुप्रिया सुळे)