श्रद्धा कपूरचं 'या' को-स्टारवर होतं क्रश

मुलाखतीत केला खुलासा 

Dakshata Thasale | Mar 03, 2021, 11:29 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सिनेसृष्टीशी संबंधीतच फॅमिली बॅकग्राऊंड असलेल्या श्रद्धा कपूरने अवघ्या 11 वर्षात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. चाहत्यांना वेड लावणारी श्रद्धा कपूर एकेकाळी कुणाला तरी मनापासून पसंत करत होती. श्रद्धाने दिलेल्या मुलाखतीत आपलं क्रश कोण होतं याचा खुलासा केला आहे. श्रद्धाच्या वाढदिवसादिवशी जाणून घेऊया ही खास गोष्ट. 

1/8

श्रद्धा कपूरने 2016 मध्ये 'बागी' सिनेमात टायगर श्रॉफसोबत काम केलं. हा सिनेमा हिट झाल्यानंतर दोघांची जोडी खूप लोकप्रिय झाली. रील लाइफमधील हा को-स्टार श्रद्धा कपूरचा क्रश होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली होती. 

2/8

सर्वात अगोदर टायगरने सांगितलं की, त्याला शाळेत असताना श्रद्धावर क्रश होतं. यावर श्रद्धाने देखील आपल्या भावनांची कबुली दिली होती. शाळेत असताना श्रद्धाला देखील टायगरवर क्रश होतं.   

3/8

शाळेत या दोघांच्या फिलिंग एकमेकांबद्दल फार वेगळ्या होत्या. यामुळे त्याचं नातं पुढे सरकू शकलं नाही. त्यानंतर टायगरने श्रद्धाला प्रपोझ न केल्याचं दुःख व्यक्त केलं आहे. मी फक्त तिला पाहतच राहायचो. मी तिला घाबरायचो. मी फक्त तिला बघत राहायचो 

4/8

श्रद्धाने आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात 2010 मध्ये 'तीन पत्ती' नावाच्या सिनेमातून केली. मात्र 2013 मध्ये 'आशिकी 2' सिनेमातून स्टारडम मिळालं. त्यानंतर तिचं आयुष्यंच बदललं, त्यानंतर श्रद्धाला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. 

5/8

श्रद्धाने विलेन, हैदर, एबीसीडी 2, रॉक ऑन 2, हाफ गर्लफ्रेंड, हसीना पार्कर, स्त्री सारख्या सिनेमात अभिनय केला आहे. श्रद्धाने साऊथ स्टार प्रभाससोबत साहो सिनेमांतही काम केलं आहे. 

6/8

श्रद्धाने छिछोरे सिनेमात सुशांत सिंह राजपूतसोबत काम केलं आहे. हा सिनेमा देखील हिट ठरला. तिला 'बागी 3' या सिनेमातही पाहिलं आहे. हा सिनेमा फार चालला नाही. 

7/8

श्रद्धाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर श्रद्धाचं नाव फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबत जोडलं गेलं आहे. ते रिलेशनशिपमध्ये चर्चा आहे. ते दोघं ही आपल्या नात्याबद्दल खूप खासगी आहे.   

8/8