तुम्हालाही टोमॅटो खायला आवडतो का? थांबा, आधी हे वाचा!

Side effects of Excessive Tomato In Marathi : कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे कधीही चांगले नसते. जर तुमच्या फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टीही प्रमाणाबाहेर केल्यास त्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो. खाद्यपदार्थांच्या ही बाबती हा नियम लागू होऊ शकतो. भाज्या आणि फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. पण प्रमाणाबाहेर त्या खाल्ल्यास त्यामुळे आपल्या आरोग्लायाला फायदा नव्हे तर नुकसान होऊ शकते. आपल्या सर्वांना नुसता टोमॅटो खायला आवडतो. पण त्याचेही प्रमाण अधिक झाल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम...   

Jun 08, 2023, 14:33 PM IST
1/5

टोमॅटोचे दुष्परिणाम

Side effects of Excessive Tomato

टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु कधीकधी यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने कोणते दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊया.

2/5

अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो

Side effects of Excessive Tomato

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-सी म्हणजेच एस्कॉर्बिक अॅसिड यासारखी अशी अनेक अॅसिड्स आढळतात. त्यामुळे टोमॅटो आम्लयुक्त असतो. त्यामुळे जर तुम्ही जास्त खाल्ले तर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.

3/5

गॅसची समस्या

Side effects of Excessive Tomato

ज्या लोकांना गॅसची समस्या आहे, त्यांनी जास्त टोमॅटो खाणे टाळावे. कारण टोमॅटो आम्लयुक्त असतो, टोमॅटोतून गॅस तयार होतो. फक्त टोमॅटोचे सेवन करताना त्यामध्ये काळे मीठ घातल्यास गॅसच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळतो.

4/5

मुतखडा

Side effects of Excessive Tomato

ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, अशा लोकांनी टोमॅटो खाणे टाळावे. टोमॅटो बियाण्यांमुळे तुमची स्टोनची समस्या खूप वाढू शकते. टोमॅटोचे सेवन करायचे असल्यास त्यातील अर्धे बिया काढून टाका. त्यानंतर टोमॅटो खा.

5/5

छातीत जळजळ

Side effects of Excessive Tomato

अनेकांना जागरण केल्यामुळे जळजळ होण्याची समस्या जास्त होते. ज्यांना छातीत जळजळ होण्याची शक्यता असते, अशा लोकांनी टोमॅटो खाऊ नये. जर तुम्ही टोमॅटोचे जास्त सेवन करत असाल तर तुम्हाला छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)