मागच्या 6 महिन्याची कॉल हिस्ट्री हवीय? करा फक्त एवढंच

 टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

| Feb 10, 2024, 16:41 PM IST

Smartphones Call History: टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

1/9

मागच्या 6 महिन्याची कॉल हिस्ट्री हवीय? करा फक्त एवढंच

Smartphones Call History Last 6 Months Jio Airtel Network

Smartphones Call History: स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.  कॉलिंग, मेसेजिंगपासून इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी स्मार्टफोनची गरज लागते. दिवसभर आपल्याला अनेक फोन कॉल्स येत असतात. अशावेळी मागच्या एखाद्या महिन्यात आपण कोणाला फोन केला? हे आपल्याला आठवत नाही. पण तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. 

2/9

टेलिकॉम कंपन्याकडून पर्याय

Smartphones Call History Last 6 Months Jio Airtel Network

एक महिन्याची कॉल हिस्टरी मिळवणे खूप सोपे असती. ती तर तुम्हाला तुमच्या  फोनवरील कॉल लॉगमध्ये मिळून जाईल. टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

3/9

जिओ आणि एअरटेल

Smartphones Call History Last 6 Months Jio Airtel Network

तुम्हाला गेल्या 6 महिन्यांचे कॉल डिटेल्स मिळवायचे असतील तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करुन मिळून जाईल. जिओ आणि एअरटेलचे नेटवर्क वापरणाऱ्यांना ही माहिती फायदेशीर ठरणार आहे. 

4/9

जिओ नंबरवरील कॉल हिस्टरी

Smartphones Call History Last 6 Months Jio Airtel Network

जिओ युजर्स असाल तर MyJio ॲप वापरून तुमचे कॉल रेकॉर्ड काढू शकता. यासाठी सर्वातआधी MyJio ॲप इन्स्टॉल करा

5/9

जिओ नंबर लिंक

Smartphones Call History Last 6 Months Jio Airtel Network

लॉग इन करुन सर्वात आधी तुमचा जिओ नंबर लिंक करा. यानंतर ॲपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात 3 डॉट लाइनवर क्लिक करा आणि 'माय स्टेटमेंट' पर्यायावर टॅप करा.

6/9

हवी ती तारीख निवडा

Smartphones Call History Last 6 Months Jio Airtel Network

आता तुम्हाला कॉल रेकॉर्ड हवी ती तारीख निवडा. यानंतर View वर टॅप करा. आता कॉल रेकॉर्ड तुमच्या समोर येतील.

7/9

एअरटेल युजर्ससाठी

Smartphones Call History Last 6 Months Jio Airtel Network

एअरटेल युजर्स असाल तर मोबाईलवर मेसेज ॲप उघडा आणि रिसीव्हरवर '121' डायल करा.

8/9

तारीख डायल करा

Smartphones Call History Last 6 Months Jio Airtel Network

आता मेसेजमध्ये 'EPREBILL' टाइप करा. यानंतर कॉल डिटेल्स हवी असलेली तारीख डायल करा.

9/9

ईमेल आयडी टाका

Smartphones Call History Last 6 Months Jio Airtel Network

त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाका. शेवटी तुमच्या एअरटेल मोबाईल नंबरवरून मेसेज पाठवा.