पृथ्वीवर पहिल्यांदाच असं काही तरी घडलंय; सौदी अरेबियाच्या रखरखत्या वाळवंटात तुफान बर्फवृष्टी

सौदी अरेबियाच्या रखरखत्या वाळवंटात झालेल्या बर्फवृष्टीचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. 

| Nov 08, 2024, 17:54 PM IST

Snowfall in Saudi Arab Al Jouf : सौदा अरब म्हंटल की डोळ्यासमोर उभा राहतो रखरखता वाळवंट. कडक ऊन आणि दूरवर नजर जाईल तिथपर्यंत दिसणारी वाळू असे चित्र सौदी अरेबियाच्या वाळवंटात दिसते. मात्र, जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या  वाळवंटात तुफान बर्फवृष्टी झाली. या नैसर्गित चमत्काराने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. वाळवंटात झालेल्या या बर्फवृष्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

1/7

सौदी अरेबियाच्या वाळवंटात पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाली आहे. सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. रस्तेत देखील बर्फाखाली झाकले गेले आहेत. 

2/7

अल-जॉफ वाळवंट झालेली ही घटना जगासाठी धोक्याचा इशारा मानली जात आहे. ग्लोबल वार्मिंगचा हा परिणाम असल्याची चिंता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. 

3/7

 येत्या काही दिवसात अल-जॉफ वाळवंट परिसरात अत्यंत खराब हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. 

4/7

मागील दोन दिवसांपासून अल-जॉफ वाळवंट परिसरात उन, वारा, पाऊस आणि आता बर्फवृष्टी असे विचित्र हवामान पहायला मिळत आहे.   

5/7

जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच उष्ण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल-जॉफ वाळवंट बर्फवृष्टी झाली आहे.  

6/7

अल-जॉफ वाळवंट हा सौदी अरेबियातील सर्वात उष्ण परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात आता सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे.   

7/7

 सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या वाळवंटापैकी असलेल्या अल-जॉफ वाळवंटात  हीबर्फवृष्टी झाली आहे. अल-जौफ भागात बर्फवृष्टी झाल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.