तब्बल 2000 कोटींचा मालक, AR Rahaman पत्नी सायरा बानोला किती पोटगी देणार?
संगीतकार एआर रहमान आणि सायरा बानो यांनी घटस्फोट घेतला आहे. 29 वर्षांचा संसार मोडून या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 2000 कोटी रुपयांचा मालक असलेला रहमान आता Ex पत्नीला किती पोटगी देणार?
एआर रहमानने 19 नोव्हेंबर रोजी पत्नी सायरा हिला घटस्फोट दिला आहे. एआर रहमानच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. 29 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. यावर त्यांच्या मुलांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर एआर रहमान Ex पत्नीला किती पोटगी देणार याबाबत प्रश्न विचारला जात आहे. यावर वकिल वंदना शाह यांनी उत्तर दिलं आहे.





