कोणाला जलेबीचे तर कोणाला पिज्जा खाण्याचे डोहोळे लागलेत... बॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या प्रेग्नंसिचे अफलातून किस्से...वाचा

मुंबई : तुम्हाला माहितीये, बॉलिवूडच्या अभिनेत्रींची लाईफस्टाईल जशी वेगळी आणि स्पेशल असते. त्याच बरोबर त्यांच्या आयुष्यातले किस्से देखील स्पेशल आणि वेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या डोहाळ्यांबद्दल माहिती सांगणार आहोत. 

Sep 20, 2022, 18:20 PM IST
1/5

बिपाशा बसूला (Bipasha Basu)

बिपाशा बसूला (Bipasha Basu) गरोदरपणात जिलेबी खायला खूप आवडतीये. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिलं की, तिला गोड खाण्याची इच्छा आहे आणि त्याला जिलेबी खाऊन आनंद मिळतोय.

2/5

आलिया भट्ट (Alia Bhatt)

कपूर घराण्याची नवी सून झाल्यानंतर गरोदरपणामुळे चर्चेत आलेली आलिया भट्ट खाण्यापिण्याचीही शौकीन आहे. त्याचबरोबर, आलियाला आजकाल मिठाई तर कधी पिझ्झा खायला आवडतोय. आलियाची पिझ्झाची तळमळ इतकी तीव्र होती की तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना मुंबईत रात्री पिझ्झा कुठे मिळेल असा प्रश्न विचारला.

3/5

सोनम कपूर

हेल्दी खाण्याच्या नियमाचे पालन करणाऱ्या सोनम कपूरला (Sonam Kapoor) गरोदरपणात चॉकलेट केक (chocolate cake) खाण्याची सतत इच्छा होत होती. त्याच काळात सोनमलाही फिरणी (phirni) खाण्याची खूप ओढ होती.

4/5

करीना कपूर (Kareena Kapoor)

खाण्या-पिण्याचा प्रश्न येतो तेव्हा करीना कपूरला रोखणं कठीण असतं. करीना तिच्या दोन्ही गरोदरपणात खूप व्यायाम करताना दिसली होती, तर बेबो देखील यावेळी तिच्या आवडीच्या गोष्टींचा आस्वाद घेत होती. करिनाची न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी सांगितलं होतं की, पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये करीना कारले खात होतीॉ, तर दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये करीनाला चॉकलेट केक, बिर्याणी, पास्ता, पिझ्झा आणि कबाब यांसारखे पदार्थ हवे होते.  

5/5

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)

आराध्या पोटात असताना तिची आई म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन हिलाही वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायचे होते. ऐश्वर्या गरोदरपणात ढोकळा (Dhokla) आणि चिंचेचे लोणचे खात होती.