काहीजण फायद्यासाठी प्रेम...; EX गर्लफ्रेंडच्या लग्नानंतर Prithvi Shaw ची पोस्ट व्हायरल

पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंह यांच्या अफेअरची चर्चा एकेकाळी रंगली होती.

Mar 12, 2023, 22:00 PM IST
1/5

पृथ्वी शॉच्या एक्स गर्लफ्रेंडचं नुकचंच लग्न झालं आहे. अभिनेत्री प्राची सिंहने गायक मधुर शर्माचा हात धरला. 9 मार्च रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.

2/5

प्राचीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पृथ्वी शॉच्या इंस्टाग्राम स्टोरीचा अर्थ चाहत्यांनी लावला आहे. ही स्टोरी त्याने प्राचीच्या लग्नाच्या दिवशी शेअर केली होती.

3/5

पृथ्वी शॉ याने म्हटलं होतं की, काही व्यक्ती तुमच्यावर फायद्यासाठी प्रेम करतात. जेव्हा फायदे मिळणं थांबत तेव्हा त्यांची निष्ठाही संपून जाते.

4/5

शॉ आणि प्राची यांच्या अफेअरची चर्चा होती. 2020 मध्ये दोघंही एका फोटोमध्ये एकत्र दिसले होते. याशिवाय प्राचीने पृथ्वीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिलेल्या.

5/5

मात्र त्यानंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचं पाहायला मिळालं.