नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; सोमेश्वर धबधबा खळखळला

नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित झाला आहे. 

Sep 09, 2023, 20:38 PM IST

Nashik Someshwar Waterfall :   यंदाच्या पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सोमेश्वर धबधबा आपल्या मूळ रूपामध्ये आला आहे धबधब्याच्या तीनही बाजूने पाणी वाहू लागला आहे. यामुळे सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी झाली आहे. 

1/7

नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात असलेला सोमेश्वर धबधबा  पर्टकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. 

2/7

या धबधब्याचा प्रवाह हा इंग्रजीतील S अक्षरासारखा दिसतो.  या धबधब्याच्या जवळच काही पायऱ्या देखील आहेत. जेणेकरून पर्यटकांना धबधब्याच्या आणखी जवळ जाता येऊ शकतो.

3/7

नाशिक शहरापासून सोमेश्वर हा धबधबा 11 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.  

4/7

गोदावरी नदीमुळे हा सुंदर असा धबधबा तयार झाला आहे.हे नाशिक जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. 

5/7

सोमेश्वर धबधब्याला दूध सागर धबधबा असेही म्हंटले जाते. या धबधब्याची उंची साधारणपणे दहा मीटर इतकी आहे. 

6/7

सोमेश्वर धबधबा हा नाशिक जिल्ह्यातील आंबेडकर नगर येथील, गोदावरी नदीच्या पात्रात प्रवाहित होतो.  

7/7

गोदावरी खळाळल्याने गोदावरी काठावरील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे तर शेतकरी सुखावला आहे. तसेच सोमेश्वर धबधब्याचे सौंदर्य पाहून पर्यटक देखील आनंदी झाले आहेत.