PHOTO : चित्रपटासाठी घटवलं 30 किलो वजन, अभिनयात फ्लॉप असूनही महिन्याला कमवते इतके कोटी, एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का

Sonam Kapoor Net Worth : ही चिमुकली अभिनयात फार कमाल करु शकली नाही. तरी जगतेय आलिशान आयुष्य. सर्वाधिक आयकर भरणाऱ्या टॉप सेलिब्रिटींपैकी ती एक आहे. 

Jun 09, 2024, 11:13 AM IST
1/7

या चिमुकलीने 17 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला 86 किलोवरुन 30 किलो वजन कमी करावं लागलं होतं. संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट आणि सोबत रणबीर कपूर. 

2/7

आम्ही कोणाबद्दल अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूरबद्दल. आज तिच्या वाढदिवस असून 39 वर्षांची झाली आहे. सावरिया या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि राणी मुखर्जीदेखील होता. पण चित्रपट फ्लॉप ठरला. 

3/7

चित्रपटांसह ही अभिनेत्री स्वत:चा व्यवसायही करते. तिला बॉलिवूडमध्ये 'फॅशनिस्टा'चा टॅग दिलाय. आपल्या सौंदर्याने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी सोनम कपूर करोडोंची मालकिण आहे. महागड्या गाड्यांपासून ते आलिशान बंगल्यापर्यंत तिच्याकडे सर्व काही आहे. 

4/7

रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूर आहुजाची एकूण संपत्ती 95 कोटी रुपये असून तिचं वार्षिक उत्पन्न सुमारं 6 कोटींचा घरात आहे. अभिनेत्रीचे कपडे, हँडबॅग, सनग्लासेस आणि शूजचे लक्झरी ब्रँड वापरते. 

5/7

सोनमकडे अनेक महागड्या कारचं कलेक्शन असून त्यात Audi A6, BMW X5, Land Rover Discovery आणि Audi A4 C सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे.

6/7

अभिनेत्रीच्या कमाईचा मुख्य स्त्रोत ब्रँड एंडोर्समेंट असून ती त्यातून करोडो रुपये कमवते. सोनम ही भारतातील आणि जगभरातील काही मोठ्या ब्रँडचा चेहरा असून त्यातून ती भक्कम कमाई करते.  

7/7

सोनमचा एक आलिशान बंगला दिल्लीत असून तो 3,170 स्क्वेअर यार्डमध्ये पसरलेलाय. सोनम कपूरनेही काही वर्षांपूर्वी मुंबईत एक आलिशान घर खरेदी केलंय. ज्याची सुमारे 24.6 कोटी रुपये आहे. सोनम कपूरने नॉटिंग हिल, लंडनमध्ये एक आलिशान घर खरेदी केलंय. त्यामध्ये रॉयल इंटीरियर बनवलंय.