महाराष्ट्रातील प्रसिद्ध साई प्रसादालयात आहे भारतातील सर्वात मोठा किचन; श्रीमंत गरीब सगळे एका पंगतीत जेवायला बसतात

महाराष्ट्रात आहे भारतातील सर्वात मोठं प्रसादालय. 

| Jun 08, 2024, 23:50 PM IST

Shri Saibaba Prasadalaya : शिर्डीतील साईबाबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.  देशविदेशातून भाविक साईबाबांच्या दर्शनाला येतात. इथं येणारं कुणीही उपाशी राहत नाही. इथं श्रीमंत गरीब सगळे एका पंगतीत जेवायला बसतात. शिर्डीतील साई प्रसादालय हे महाराष्ट्रातील सर्वात  प्रसिद्ध आणि मोठं प्रसादालय आहे. 

1/7

भारतातील सर्वात मोठा किचन हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साई प्रसादालयात हा किचन आहे.  

2/7

सकाळी 9.30 ते रात्री 9.30 या वेळेत हे प्रसादालय सुरु असते.  येथे उत्तम स्वच्छता राखली जाते. तसेच प्रसदालयाचे कामकाज अगदी नियोजनपद्धतीने चालते. 

3/7

विशेष म्हणजे या प्रसादालयात आधुनिक तंत्रज्ञाचा वपार केला जातो. प्रसादालयाच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यात आले आहेत. सोलर पॅनलच्या मदतीने स्वयंपाक केला जातो. 

4/7

या प्रसादालयात दररोज 6 हजार किलो पिठाचा वापर केला जातो. चपात्या बनवण्यासाठी 5 मशिन आहेत. येथे एका तासात जवळपास 30 हजार चपात्या बनवल्या जातात.   

5/7

साई बाबांनी स्वत: भोजन बनवून येथे भाविकांना प्रसाद म्हणून खायला दिले असे सांगितले जाते. अनेक वर्षांपासून येथील प्रसादलय सुरु आहे. 

6/7

शिर्डी साई मंदिरापासून थोड्याच अंतरावर हे प्रसादालय आहे. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक आवर्जून येथे प्रसादाचा लाभ घ्यायला येतात. विशेष म्हणजे येथे गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्व भाविक  एका पंगतीत जेवायला बसतात.

7/7

साई प्रसादालयात दररोज 60 लोकांचे जेवण बनते. या प्रसादालयात एकावेळेस 3500 भाविक जेवायला बसतात इतकं मोठं हे प्रसादालय आहे.