नात्यात तणाव आणि मानसिक नैराश्यने त्रस्त आहात? मग अशी करा चंद्रदेवाची पूजा

 चंद्राची कृपा मिळवायची असेल तर महादेवाची उपासना जरुर करावी, असं शास्त्रात सांगितलं जातं.   

Jul 10, 2024, 15:37 PM IST
1/9

हिंदूशास्त्रानुसार  समुद्रमंथनाच्या वेळी आलेलं अमृत घेऊन दानवांनी पळवलं त्यामुळे देवतांच्या हितासाठी महादेवांनी हलाहल प्राशन केलं. 

2/9

या हलाहलामुळे महादेवांच्या शरीराची लाही लाही झाली आणि म्हणूनच त्यांनी डोक्यावर चंद्र आणि केसांत गंगा ठेवली,  अशी आख्यायिका सांगितली जाते. 

3/9

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. जर तुमच्या पत्रिकेत चंद्र कमकुवत असेल तर, मानसिक तणाव आणि नातेसंबंध बिघडणं अशा त्रासांना सामोरं जावं लागतं.   

4/9

ज्योतिष शास्त्रानुसार जर सतत मानसिक नैराश्य येत असेल तर, चंद्रदेवांच्या मंत्राचा जप  करावा. 

5/9

पत्रिकेतील चंद्राचं बळ वाढवण्यासाठी ओम सों सोमाय नम: या मंत्राचा जप केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. 

6/9

चंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सोमवारचा उपवास करु शकता.  त्याचबरोबर चंद्रोदय झाल्यावर चंद्रदेवाला तुम्ही जल अर्पण केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते.   

7/9

संध्याकाळी तुम्ही प्रसाद म्हणून महादेवांना खीर अर्पण केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात. 

8/9

चंद्र हा शीतल असल्याने पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात राहिल्याने शुभकारक मानलं जातं. 

9/9

पत्रिकेतील कमकुवत चंद्र अनेक समस्या निर्माण करतो. त्यामुळे चंद्रबळ वाढवण्यासाठी तुमच्या घरातील आईसमान व्यक्तींचा सन्मान करावा.  ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )