Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाला राशीनुसार करा उपाय आणि दान! आयुष्य होईल सूर्यासारखं तेजस्वी

Solar Eclipse 2023 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असलं तरी हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण सूर्याने ग्रहण काळात मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सूर्य गोचरचा 12 राशींवर परिणाम होणार आहे. 

Apr 20, 2023, 10:31 AM IST

Surya Grahan 2023 Remedies : सूर्यग्रहण काळाच सूर्य मेष राशीत प्रवेश केला आहे. शिवाय सूर्यावर राहु केतूची सावलीदेखील असणार आहे. याशिवाय दोन ग्रहांचा अशुभ योग ही निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती प्रत्येक राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. (surya grahan 2023 upay daan mantra on solar eclipse according to zodiac sign shani dev)

1/13

राशीनुसार मंत्र, दान आणि उपाय

ज्योतिषशास्त्रात ग्रहणाच्या वेळी राशीनुसार दान, मंत्र आणि उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास जीवनात सूर्यासारखे तेजस्वी निर्माण होतं. 

2/13

मेष (Aries)

उपाय - हनुमान चालिसाचं पठण करावे. मंत्र - तुळशीमालासोबत 'ॐ ह्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी नारायणाय नमः:'  या मंत्राचा जप करावा. दान -  गूळ, गहू, मसूर, लाल वस्त्र इत्यादींचे दान करावे.

3/13

वृषभ (Taurus)

उपाय -  शुभ्र वस्त्रे परिधान करून श्री सूक्ताचे पठण करावे. दान - दही, दूध, साखर, पांढरे कपडे, कापूर, खीर इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे दान करावे.

4/13

मिथुन (Gemini)

उपाय - विष्णु सहस्रनामाचे पठण करावं. दान -  गाईला हिरवा चारा खायला द्यावा, हिरवी मूग डाळ, पितळेची भांडी, हिरव्या भाज्या, हिरवे कापड इत्यादी दान करावे. 

5/13

कर्क (Cancer)

उपाय - रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. मंत्र - 'ॐ ह्रीं हिरण्यगर्भाय अव्यक्तरूपिणे नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. दान -  मोती, पांढरे कपडे, साखर, तांदूळ, दूध किंवा दुधापासून बनवलेल्या मिठाईसारख्या पांढर्‍या वस्तूंचे दान करावे. 

6/13

सिंह (Leo)

उपाय - कनकधारा स्तोत्राचा पाठ करा. मंत्र - 'ॐ क्लीं ब्राह्मणे जगदाधाराय नम:' या मंत्राचा जप करा. दान -   गूळ, गहू, तांब्याची भांडी, लाल आणि केशरी वस्त्र दान करा. 

7/13

कन्या (Virgo)

उपाय - आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. मंत्र - 'ॐ पीं पिताम्बराय नम:' या मंत्राचा जप करा. दान -   हिरवी मूग डाळ, पितळेची भांडी, गाईला हिरवा चारा, हिरव्या भाज्या, हिरवे कापड, हिरवी फळे इत्यादी दान करा.

8/13

तूळ (Libra)

उपाय - रामचरितमानस पठण करा. मंत्र - 'ॐ तत्व निरंजनाय तारक रामाय नम:'  या मंत्राचा जप करा.  दान -   खीर, दही, साखर, दूध, पांढरे कपडे, कापूर इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे दान करावे.

9/13

वृश्चिक (Scorpio)

उपाय - महाभारताचे पठण करा. मंत्र - 'ॐ नारायणाय सुरसिंहायै नम:'  या मंत्राचा जप करा. दान -    गहू, मसूर डाळ, गूळ, लाल वस्त्र, फळे इत्यादी गोष्टींचे दान करणे शुभ राहील.

10/13

धनु (Sagittarius)

उपाय - श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करावे. मंत्र - 'ॐ श्रीं देवकृष्णाय उर्ध्वजाय नम:' या मंत्राचा जप करा. दान - पिवळी फळे, हरभरा डाळ, पिवळे कपडे, बेसन, केशर, हळद, गूळ इत्यादी पिवळ्या वस्तूंचे दान करावे.

11/13

मकर (Capricorn)

उपाय - सुंदरकांडाचे पठण करा . मंत्र - 'ॐ श्रीं वत्सलाय नम:'  या मंत्राचा जप करा. दान - शनिशी संबंधित वस्तू जसे काळी छत्री, कंगवा, काळी किंवा निळी तूरडा, मोहरीचे तेल, तीळ, लोखंडाची भांडी दान करा. 

12/13

कुंभ (Aquarius)

उपाय - हनुमान चालीसा किंवा शिव चालीसा पाठ करा. मंत्र - 'ॐ श्रीं उपेन्द्राय अच्युताय नम:' या मंत्राचा जप करा. दान - लोखंडी भांडी, कपडे, गरीब आणि गरजूंना मदत करणे, एखाद्याला खाऊ घालणे.

13/13

मीन (Pisces)

उपाय -  रामचरित मानसातील अरण्य कांडाचा पाठ करा. मंत्र - 'ॐ क्लीं उद्धृताय उद्धारिणे नम:' या मंत्राचा जप करा. दान - कुत्र्याला भाकरी द्यावी, पिवळी फळे, पिवळे कपडे, हरभरा डाळ, केशर, बेसन, हळद, गूळ इत्यादी वस्तू दान करणे उत्तम राहील. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)