Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवचा डाएट प्लान आणि नेटवर्थ माहितीय का? जाणून घ्या
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव टी20 वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आज देखील त्याने झिम्बाब्वे विरूद्ध 25 बॉलमध्ये 61धावा केल्या. या खेळीसह T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा सूर्यकुमार यादव भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. दरम्यान त्याच्या या विक्रमाची चर्चा असताना त्याचे डाएट प्लान काय असते? आणि त्याच नेटवर्थ किती ते जाणून घेऊयात.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव टी20 वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आज देखील त्याने झिम्बाब्वे विरूद्ध 25 बॉलमध्ये 61धावा केल्या. या खेळीसह T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा सूर्यकुमार यादव भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. दरम्यान त्याच्या या विक्रमाची चर्चा असताना त्याचे डाएट प्लान काय असते? आणि त्याच नेटवर्थ किती ते जाणून घेऊयात.



सूर्यकुमार यादवची गणना फिट खेळाडूंमध्ये केली जाते. तो डाएट प्लॅन अतिशय काटेकोरपणे फॉलो करतो. तो नाश्त्यासाठी प्रोटीन स्मूदीज घेण्यास प्राधान्य देतो, ज्यामुळे त्याला दिवसभर ताकद मिळेल. यानंतर तो दुपारच्या जेवणात चिकन भाज्यांची कोशिंबीर, चीज किंवा दही घेतो. रात्री, तो कमी प्रमाणात अन्न खातात, जेणेकरून अन्न योग्य प्रमाणात पचले जाऊ शकते.
