पितृ पक्षात पडलेल्या 'या' 5 स्वप्नांचा काय असतो अर्थ? जाणून घ्या

पितृ पक्ष 2024 ला सुरुवात झाली असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाणार आहे.  भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पितृ पक्ष म्हणतात.

| Sep 18, 2024, 19:01 PM IST

Pitru paksh 2024:पितृ पक्ष 2024 ला सुरुवात झाली असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाणार आहे.  भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पितृ पक्ष म्हणतात.

1/9

पितृ पक्षात पडलेल्या स्वप्नांचा काय असतो अर्थ?

Pitru paksh 2024 5 dreams very auspicious sign of happiness and prosperity in life

Pitru Paksh 2024:पितृ पक्ष 2024 ला सुरुवात झाली असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाणार आहे.  भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पितृ पक्ष म्हणतात. प्रत्येक वर्षी 16 दिवसांचा हा कालावधी येतो. मृत झालेल्या पूर्वज किंवा नातेवाईकांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते. या काळात पडलेल्या स्वप्नांचे वेगळे महत्व आहे.

2/9

अनेक समस्या दूर होण्याचे द्योतक

Pitru paksh 2024 5 dreams very auspicious sign of happiness and prosperity in life

पितृ पक्षाच्या काळात जर तुम्ही स्वप्नात तुमच्या पूर्वजांना काही विशिष्ट स्थितीत पाहत असाल तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते. ही स्वप्ने तुमचा भविष्यातील सुख, समृद्धी आणि विकास दर्शवतात आणि स्वप्ने तुमच्या अनेक समस्या दूर होण्याचेही द्योतक आहेत. पितृ पक्षात पडलेल्या स्वप्नांचे अर्थ समजून घेऊया. 

3/9

स्वप्नात पाणी पाहणे

Pitru paksh 2024 5 dreams very auspicious sign of happiness and prosperity in life

पितृ पक्षामध्ये एखाद्या व्यक्तीला नदी, तलाव, समुद्र इत्यादी पाण्याशी संबंधित स्वप्न पडले तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते. म्हणजे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांचा आत्मा तृप्त आहे. हे स्वप्न सांगते की आता तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल.

4/9

पूर्वजांना पांढऱ्या कपड्यात पाहणे

Pitru paksh 2024 5 dreams very auspicious sign of happiness and prosperity in life

पितृ पक्षाच्या काळात स्वप्नात पांढऱ्या कपड्यात पूर्वज दिसले तर तेही खूप शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न पितरांच्या समाधानाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणते. पांढरा रंग शांती आणि मुक्तीचे प्रतीक आहे, म्हणून स्वप्नात आपल्या पूर्वजांना पांढऱ्या कपड्यात पाहणे हे देखील दर्शवते की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आहे.

5/9

स्वप्नात फुले, फळे पाहणे

Pitru paksh 2024 5 dreams very auspicious sign of happiness and prosperity in life

पितृ पक्षात फुल किंवा फळांचे स्वप्न दिसले तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्या कृतीने प्रसन्न आहेत.आगामी काळात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील, कुटुंबाच्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवन सुरळीतपणे प्रगती करेल, असा याचा अर्थ होतो.

6/9

स्वप्नात पितरांकडून मिठाई खाणे

Pitru paksh 2024 5 dreams very auspicious sign of happiness and prosperity in life

तुमचे पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालत आहेत, असे स्वप्नात दिसत असेल तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते.तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे, असा याचा अर्थ होतो. तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन नवीन दिशेने जाईल. तुम्हाला संपत्ती आणि सन्मान मिळेल.

7/9

स्वप्नात पूर्वजांना आनंदी पाहणे

Pitru paksh 2024 5 dreams very auspicious sign of happiness and prosperity in life

जर स्वप्नात पूर्वज हसताना आणि आनंदी दिसत असतील तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते. पितृ पक्षात दिसणारे हे स्वप्नही तुमच्या प्रगतीचे सूचक आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात जो काही मार्ग स्वीकारत आहात तो योग्य आहे आणि तुमचे पूर्वज देखील तुमच्या कृतीवर आनंदी आहेत.

8/9

अशी स्वप्ने पाहणे म्हणजे पितृदोष नाही

Pitru paksh 2024 5 dreams very auspicious sign of happiness and prosperity in life

या स्वप्नांना शुभ मानले तर अशी स्वप्ने पाहणे म्हणजे पितृदोष नाही. तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करत राहतील.

9/9

डिस्क्लेमर

Pitru paksh 2024 5 dreams very auspicious sign of happiness and prosperity in life

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)