Swapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात तुमचे पूर्वज दिसतात? 'हे' शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या

Swapna Shastra Pitru Paksha : रात्री झोपल्यानंतर अनेक प्रकारचे स्वप्न आपल्याला पडतात. स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात दिसलेल्या गोष्टी हे भविष्यात येणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टींचं संकेत असतं. 

नेहा चौधरी | Sep 13, 2024, 16:03 PM IST
1/7

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पूर्वजांना स्वप्नात पाहते त्याचे अनेक निष्कर्ष निघतात, असं स्वप्न शास्त्रात सांगण्यात आलंय. 

2/7

काही लोकांसाठी स्वप्नात पितर दिसणे हे शुभ संकेत असतं. तर काहींसाठी ते असुभ असू शकतं. मुळात तुम्ही पितरांना कुठल्या रुपात पाहिलं आहे हे महत्त्वाच आहे. 

3/7

यंदा पितृपक्ष 18 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. यामध्ये पितर श्राद्ध, पिंडदान, तर्पण या विधींना महत्त्व आहे. 

4/7

स्वप्न शास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांना स्वप्नात रडताना किंवा रागावलेले पाहता, तेव्हा ते अशुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही केलेल्या एखाद्या गोष्टीचा त्यांना राग आलाय.

5/7

जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तुमच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा पाहत असाल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तो तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. याचा अर्थ असाही होऊ शकतो की त्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, ज्या त्याला तुमच्याद्वारे पूर्ण करायच्या आहेत.  

6/7

जर तुमचे पूर्वज तुमच्या स्वप्नात तुम्हाला खाण्यासाठी काही विचारत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की ते समाधानी नाही. अशा स्थितीत अमावस्येच्या दिवशी किंवा पितर तिथीच्या दिवशी पितरांसाठी ब्राह्मणांना दान द्यावं. असे केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.

7/7

जर तुम्ही स्वप्नात तुमच्या पूर्वजांना आनंदी, एकत्र बसलेले किंवा पांढरे कपडे घातलेले दिसले तर ते स्वप्न शास्त्रात शुभ मानले गेले आहे. म्हणजे तुमचं पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत. अशा स्थितीत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)