स्वातंत्र्य लढ्यात शूरवीरांप्रमाणेच 'या' रणरागिणींचंही मोलाचं योगदान, आपण यांना विसरतोय का?

आपल्या देशात साजरा करण्यात येत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज आम्ही तुम्हाला अशा महिलांविषयी माहिती सांगणार आहोत ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठी कामगिरी केली आहे.

Aug 09, 2022, 16:41 PM IST

 जवळ-जवळ दीडशे इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. यासाठी झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी योगदान दिलं आहे. या स्वातंत्र्यलढ्यात केवळ पुरुषचं नाही तर महिलांचंही मोठं योगदान आहे. आपल्या देशात साजरा करण्यात येत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज आम्ही तुम्हाला अशा महिलांविषयी माहिती सांगणार आहोत ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठी कामगिरी केली आहे.

1/5

अरुणा आसफ अली

अरुणा आसफ अली यांनी जेलमध्ये असताना देखील कैद्यांसाठी उपोषण केलं होतं. यामुळे त्यांना अंधारकोठडीची शिक्षा दिली गेली होती. त्यांनी मीठाच्या सत्याग्रहामध्ये सहभाग नोंदवला होता. 

2/5

विजयालक्ष्मी पंडित

विजयालक्ष्मी पंडित यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता. या संयुक्त राष्ट्र जनरल अॅसेंब्लिच्या पहिल्या महिल्या प्रेसिंडेंट देखील बनल्या होत्या. विजयालक्ष्मी या डिप्लोमॅट, राजकीय व्यक्तीच्या व्यतिरिक्त लेखिकासुद्धा होत्या. पंडित जवाहरलाल नेहरु हे विजयालक्ष्मी पंडित यांचे भाऊ होते.

3/5

सरोजिनी नायडू

सरोजिनी नायडू यांच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान होतं. सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. नंतरच्या काळात त्यांनी उत्तर प्रदेशच्या गव्हर्नर म्हणून देखील कामकज केलं आहे. 

4/5

कस्तुरबा गांधी

कस्तुरबा गांधी यांचं नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आदराने घेतलं जातं. कस्तुरबा गांधी या महात्मा गांधींच्या पत्नी होत्या. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच मोठ योगदान आहे. महिला स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका निभावली.   

5/5

झासीची राणी

1857 च्या उठावामध्ये झासीच्या राणीची प्रमुख भूमिका होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून झासीच्या राणीने पहिलं पाऊल टाकलं होतं.