PHOTO : सोन्याच्या भिंती अन् कमोड, श्रीमंतांनाही मिळत नाही मेंबरशीप; 30,000,000,000 किंमतीचं रिसॉर्ट कोणाचं?
सोन्याच्या भिंती अन् सोन्याचे कोमोड, हा रिसॉर्ट ज्या व्यक्तीचा आहे, त्याची संपत्ती कुबेरालाही लाजवेल इतक्या अफाट आहे. सध्या या रिसॉर्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे. कारण मार-ए-लागो रिसॉर्ट विश्वाचं केंद्र बनलंय.
नेहा चौधरी
| Jan 20, 2025, 15:37 PM IST
1/7
2/7
डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडाच्या पाम बीच इथे असलेल्या त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्ट सध्या सत्तेचं केंद्रबिंदू बनलंय. ज्याला ट्रम्प यांनी बराच काळ आपलं घर बनवलंय. 17 एकरांवर पसरलेल्या मार-ए-लागोला विंटर व्हाईट हाऊस म्हणून ओळखला जातो. ट्रम्प यांनी हे रिसॉर्ट 1985 मध्ये विकत घेतलं होतं. ट्रम्प यांच्या शेजारी 50 हून अधिक अब्जाधीश राहतात यावरून हा परिसर किती पॉश आहे याचा अंदाज तुम्हा लावू शकता.
3/7
हा राजवाडा 1927 मध्ये बांधण्यात आला होता. 1985 मध्ये डोनल्ड ट्रम्प यांनी 1 कोटी डॉलर्सला हा बंगला विकत घेतला होता. आता या घराची किंमत 342 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात सुमारे 3 हजार कोटी रुपये आहे. जवळपास 12 एकरांवर हा राजवाडा पसरलाय. त्यामध्ये 128 खोल्या, 58 बेडरूम आणि 33 बाथरूम आहेत. तब्बल 20 हजार चौरस फुटांची बॉलरूम, 5 क्ले टेनिस कोर्ट एक वॉटरफ्रन्ट पूल असा सगळा तामझाम आहे. याशिवाय, थिएटर, खाजगी क्लब आणि स्पा देखील आहे.
4/7
ट्रम्प यांचे मार-ए-लागो घर सध्या जगातील सर्वात मोठे शक्ती केंद्र म्हणून उदयास आलंय. कारण जेव्हापासून ट्रम्प यांनी निवडणूक जिंकली, तेव्हापासून त्यांना भेटण्यासाठी जगभरातून शक्तिशाली लोक येत आहेत. मग ते टेस्लाचे मालक एलोन मस्क असो किंवा मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग. इतकेच नाही तर जेव्हा ट्रम्पने कॅनडाला टॅरिफची धमकी दिली तेव्हा जस्टिन ट्रूडो त्यांना शांत करण्यासाठी या रिसॉर्टमध्ये धावत आले. यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या रिसॉर्ट किंवा घराला विश्वाचे केंद्र म्हटलंय.
5/7
ट्रम्प यांच्या रिसॉर्टचे आजीवन सदस्यत्व शुल्क 8.50 कोटी रुपये आहे. कार्डशिवाय येथे प्रवेश नाही. प्रत्येकाकडे पैसे असूनही सदस्यत्व मिळत नाही. त्यासाठी आधी त्याचा इतिहास तपासला जातो. उदाहरणार्थ, बँक खाते तपशील, सामाजिक स्थिती आणि कौटुंबिक पार्श्वभूमी. न्यूज एजन्सी एएफपीच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येने श्रीमंत लोक यासाठी अर्ज करतात, मात्र काहींनाच सदस्यत्व मिळते.
6/7
7/7