युझवेंद्र चहल देणार 600000000 रुपयांची पोटगी? घटस्फोटानंतर धनश्री होणार मालामाल?
Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce : भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहेत. युझवेंद्र आणि धनश्री हे दोघेही घटस्फोटापूर्वी एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचे देखील बोललं जात आहे. अद्याप दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा दिलेला, परंतु दोघांनी सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर केल्या ज्यावरून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या एक रिपोर्ट समोर आला असून यात खुलासा करण्यात आलेला आहे की, चहलने कोट्यवधी रुपये देऊन धनश्रीशी सेटलमेंट केली आहे.





घटस्पोटाच्या चर्चा सुरु असताना क्रिकेटर युझवेंद्र चहल याने एक पोस्ट लिहून म्हटले होते की, 'मी माझे सर्व चाहते आणि त्यांच्या अतूट प्रेम आणि समर्थनाबद्दल कृतज्ञ आहे, त्यांच्याशिवाय मी येथे पोहोचू शकत नाही. पण हा प्रवास अद्याप संपलेला नाही !!! कारण माझ्या देशासाठी अजूनही बरेच अविश्वसनीय ओव्हर्स शिल्लक आहेत. मला एक खेळाडू असल्याचा अभिमान आहे, परंतु मी एक मुलगा, एक भाऊ आणि मित्र देखील आहे. मला अलीकडील घटनांबद्दल, विशेषत: माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल लोकांची उत्सुकता समजली. तथापि, मी काही सोशल मीडिया पोस्ट्स अशा बाबींवर अनुमान लावताना पाहिल्या आहेत ज्या कदाचित सत्य असू शकतात किंवा नसू शकतात'.
