कमीत कमी दरात करा ताडोबाची जंगल सफारी; प्रत्यक्ष वाघ पाहण्याची संधी

Maharashtra Tourism : राज्यातील सर्वात जुनं आणि सर्वात मोठं जंगल म्हणून या राष्ट्रीय उद्यानाकडं पाहिलं जातं. ताडोबा राष्ट्रीय उद्यान किंवा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असंही त्याला संबोधलं जातं.   

Aug 29, 2023, 14:09 PM IST

Maharashtra Tourism : महाराष्ट्र कायमच पर्यटनप्रेमींसाठी एक आकर्षणाचा विषय राहिला आहे. इथं समुद्रकिनारे, पर्वतरांगा, उंचच उंच डोंगराळ भाग विस्तीर्ण पसरलेलं जंगल असं सर्वकाही आहे. अशा या महाराष्ट्रातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे ताडोबाचं जंगल. 

1/8

ताडोबा सफारी

tadoba national park juggle safari in lowest rate know the details

भारतात अस्तित्वात असणाऱ्या तब्बल 47 व्याघ्र प्रकल्पांपैकी ताडोबासुद्धा एक. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात असणाऱ्या या ताडोबा सफारीसाठी नागपुरातूनही पोहोचता येतं. (छाया सौजन्य- ताडोबा नॅशनल पार्क)  

2/8

नागपूरपासून हे अंतर साधारण 150 किमी.

tadoba national park juggle safari in lowest rate know the details

नागपूरपासून हे अंतर साधारण 150 किमी. या जंगलामध्ये अनेक खडक, गुहा आणि तत्सम ठिकाणं असून, इथं मोठ्या संख्येनं वन्य प्राण्यांना आसरा मिळतो. (छाया सौजन्य- ताडोबा नॅशनल पार्क)

3/8

दरवर्षी अनेक पर्यटक येतात

tadoba national park juggle safari in lowest rate know the details

अशा या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात फेरफटका मारण्यासाठी अर्थात सफारी करण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक येतात. (छाया सौजन्य- ताडोबा नॅशनल पार्क)

4/8

हा अनुभव आणखी खास

tadoba national park juggle safari in lowest rate know the details

अशाच प्रवासवेड्या मंडळींसाठी आता हा अनुभव आणखी खास होणार आहे. कारण, ही ताडोबा जंगल सफारी आता अल्पदरात उपलब्ध होणार आहे. (छाया सौजन्य- ताडोबा नॅशनल पार्क)

5/8

नव्या क्रुजर वाहनाची निर्मिती

tadoba national park juggle safari in lowest rate know the details

सफारीसाठी नव्या क्रुजर वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्याच्या जिप्सीचे दर परवडणारे नसल्याने अनेक पर्यटक इथं बस कॅन्टरने सफारी करतात.   

6/8

कॅन्टर

tadoba national park juggle safari in lowest rate know the details

हे कॅन्टर चिंचोळ्या रस्त्याची पूर्ण जागा व्यापतात. तसंच यांचा आवाजही जास्त होतो. ज्यामुळं वन्यप्राणी जवळून पाहाता येत नाहीत. 

7/8

6 विशेष जिप्सी

tadoba national park juggle safari in lowest rate know the details

या सर्व अडचणी पाहता आता ताडोबा प्रशासनाने आता 9 पर्यटक बसू शकतील अशा 6 विशेष जिप्सी विकत घेतल्या आहेत.   

8/8

खर्चाचा विचार करुच नका

tadoba national park juggle safari in lowest rate know the details

ताडोबा कोर झोनचा पुढचा हंगाम 1 ऑक्टोबर पासून या जिप्सी पर्यटकांच्या सेवेत रुजू करण्याचा ताडोबा प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळं तुम्हीही ताडोबाच्या सफरीसाठी यायच्या विचारात असाल तर आता खर्चाचा विचार करुच नका.