TATA देणार Mahindra, Maruti ला जोरदार स्पर्धा; लाँच करणार कुपे स्टाइल 'Curvv'

देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स 7 ऑगस्ट 2024 ला आपल्या घरगुती बाजारपेठेत नवी कुपे स्टाइल एसयुव्ही Tata Curvv लाँच करणार आहे.   

Jul 14, 2024, 16:18 PM IST

देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स 7 ऑगस्ट 2024 ला आपल्या घरगुती बाजारपेठेत नवी कुपे स्टाइल एसयुव्ही Tata Curvv लाँच करणार आहे. 

 

1/11

देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स 7 ऑगस्ट 2024 ला आपल्या घरगुती बाजारपेठेत नवी कुपे स्टाइल एसयुव्ही Tata Curvv लाँच करणार आहे.   

2/11

Tata Curvv ला कॉन्सेप्ट कार म्हणून मोबिलिटी शोमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्याचवेळी ही एसयुव्ही प्रोडक्शन मॉडेलच्या जवळ पोहोचली होती.   

3/11

नुकतंच टाटा मोटर्सने आपल्या या एसयुव्हीचा टीझर जारी केला होता. गेल्या काही महिन्यांपासून कारच्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही व्हर्जिनची टेस्टिंग सुरु आहे.   

4/11

कंपनीने लेह लडाखच्या Curvv मध्ये 17 हजार फूट उंचीवर आणि मायनस 20 डिग्री तापमानात ही टेस्ंटिंग केली आहे.   

5/11

कंपनीने टाटा कर्व्हच्या पेट्रोल मॉडेलला आधी लाँच करण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये कॉन्सेप्ट कार म्हणून सादर केल्यानंतर ही कार चर्चेत आली होती.   

6/11

यानंतर गतवर्षी ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने याच्या पेट्रोल व्हर्जनवरुन पडदा उचलला होता. यानंतर या एसयुव्हीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.   

7/11

Tata Curvv ही कंपनीची पहिली कार असेल जी पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारात उपलब्ध असेल.   

8/11

ICE व्हर्जनबद्दल बोलायचं गेल्यास कंपनीने यामध्ये 1.2 लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनाचा वापर करु शकते. प्रसिद्ध नेक्सॉनमध्ये ही सुविधा आहे.   

9/11

तसंच इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये कंपनी मोठ्या बॅटरी पॅकचा वापर करु शकते. मीडिया रिपोर्टनुसार, याचं इलेक्ट्रिक मॉडेल जवळपास 500 किमीची रेंज देईल.   

10/11

या कारमध्ये फ्लोटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, इल्यूमिनेटेड लोगोसह फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील, कॅपेसिटिव्ह टच कंट्रोल, ड्रायव्हिंग मोड सिलेक्टर, वेंटिलेटेड सीट आणि पॅनारॉमिक सनरुफ मिळेल.   

11/11

याशिवाय पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, 360 डिग्री कॅमेरा सिस्टम, लेवल 2 अॅडव्हान्स बुकिंग असिस्टंट सिस्टम, जेबीएलचे 8 स्पीकर ऑडिओ सिस्टम असतील.